आर्थिक

Investment Tips : गृहिणींसाठी बचतीचे उत्तम पर्याय, फक्त 500 रुपयांपासून सुरु करा गुंतवणूक….

Investment Tips : मार्केटमध्ये गृहिंणीसाठी बऱ्याच छोट्या-मोठ्या बचत योजना आहेत, जिथे त्या गुंतवणूक करून स्वावलंबी बनू शकतात. पोस्ट ऑफिस आणि बँकेकडून महिलांसाठी एकापेक्षा एक बचत योजना ऑफर केल्या जातात, जिथे त्या गुंतवणूक करून उत्तम परतावा मिळवू शकतात. आज आम्ही तुम्हाला गुंतवणुकीचे असेच काही पर्याय सांगणार आहोत, जिथे गुंतवणूक करून महिला भविष्यात चांगला निधी गोळा करू शकतात.

गृहिणी आपल्या बचतीची थोडीफार रक्कम योग्य ठिकाणी गुंतवून चांगले फायदे मिळवू शकतात. यामुळे फालतू खर्च थांबण्यास आणि मोठा निधी निर्माण होण्यास मोठी मदत होईल. महिलांसाठी अनेक योजना आहेत ज्यात त्या गुंतवणूक करू शकतात जसे की पोस्ट ऑफिस महिला सन्मान बचत प्रमाणपत्र, एसआयपी आणि आवर्ती ठेव इ. ज्याद्वारे त्या कमी वेळेत चांगले उत्पन्न मिळवू शकतात.

तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत आरडीमध्ये दरमहा एक छोटी रक्कम जमा करू शकता. दरमहा छोट्या बचतीद्वारे मोठा निधी उभारण्याचा हा एक चांगला पर्याय असू शकतो.

यामध्ये गृहिणी दर महिन्याला काही रक्कम वाचवून गुंतवणूक करू शकतात. यामध्ये तुम्ही दरमहा काही रक्कम गुंतवू शकता. पोस्ट ऑफिसमध्ये सध्या 6.5 टक्के व्याज दिले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, SBI बँक यावर 7 टक्क्यांपर्यंत व्याजदर ऑफर करत आहे.

पोस्ट ऑफिस महिला सन्मान बचत प्रमाणपत्र अंतर्गत उघडलेले पोस्ट ऑफिस महिला सन्मान बचत प्रमाणपत्र खाते किमान 1,000 रुपयांपासून सुरू होते. पोस्ट ऑफिस महिला सन्मान बचत प्रमाणपत्रात जास्तीत जास्त 2 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सध्या त्यात जमा केलेल्या रकमेवर वार्षिक 7.5 टक्के व्याज मिळत आहे.

दरम्यान, SIP च्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे हा देखील एक चांगला पर्याय असू शकतो. याद्वारे महिला केवळ 500 रुपयांची गुंतवणूक करू शकतात. यामुळे तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. काही वर्षांत तुमच्याकडे मोठा निधी येऊ शकतो. तुम्ही SPI मध्ये दीर्घ कालावधीसाठी देखील गुंतवणूक करू शकता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ते सरासरी 7 टक्के ते 12 टक्के परतावा देते.

Sonali Shelar

Published by
Sonali Shelar

Recent Posts