आर्थिक

Investment Tips: दररोज 100 रुपयांची बचत करून होता येते करोडपती! कसे ते वाचा?

Investment Tips:- जसे आपण एखाद्या झाडाचे छोटेसे रोपटे लावतो व हळूहळू त्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर होते. अगदी त्याच पद्धतीने बचतीचे देखील आहे. अगदी कमीत कमी रकमेची जरी तुम्ही दररोज बचत केली तरी कालांतराने त्याचा खूप मोठा निधी किंवा फंड जमा होऊ शकतो. तसे पाहायला गेले तर गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत व त्यातून अनेक पर्यायांचा वापर गुंतवणूकदार करतात.

गुंतवणुकीसाठी खास करून पर्यायांची निवड करताना गुंतवणूकदार गुंतवणुकीची सुरक्षितता आणि मिळणारा परतावा या दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करूनच गुंतवणुकीचा पर्याय निवडतात. कारण कष्टाने लोकांनी पैसा गोळा केलेला असतो व तो सुरक्षित राहणे देखील तितकेच गरजेचे असते. कष्टाने कमावलेला पैसा हा किती तुम्ही कमावता त्यापेक्षा त्याची बचत किती व कशी करताय याला जास्त महत्त्व असते.

जर तुम्ही चांगल्या बचत योजनांमध्ये किंवा गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवणूक केली तर अगदी छोटीशी गुंतवणूक देखील कालांतराने खूप मोठ्या प्रमाणावर रिटर्न तुम्हाला देऊ शकतात. याचा अनुषंगाने या लेखात आपण अगदी छोटीशी गुंतवणूक तुम्हाला करोडपती कशी बनवू शकते याबद्दलची माहिती घेणार आहोत.

 प्रति दिवस शंभर रुपयांची बचत करून तुम्ही करोडपती कसे व्हाल?

दररोज जर तुम्ही प्रयत्न केला तर शंभर रुपये सहज आपण वाचू शकतो. या दृष्टिकोनातून प्रत्येक दिवसाला शंभर रुपयांची बचत महिन्याला तुम्हाला तीन हजार रुपये वाचवून देते व हे पैसे जर तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवले तर तुम्हाला 20 टक्के वार्षिक परताव्यानुसार 21 वर्षात म्हणजेच 252 महिन्यांमध्ये एक कोटी 16 लाख 5 हजार 388 रुपये इतका फंड तुमचा जमा होतो.

या 252 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही सात लाख 56 हजार रुपये जमा कराल व या एकूण जमा रकमेवर 20% नाही म्हणजे 15% जरी तुम्हाला परतावा मिळाला तरीही तुम्ही 53 लाख रुपये जमा करू शकतात. परंतु जर कमीत कमी वेळेमध्ये कोटीचे ध्येय  पूर्ण करायचे असेल तर तुम्ही गुंतवणुकीची रक्कम वाढवून हे साध्य करू शकतात.

जर म्युच्युअल फंडांचा विचार केला तर काही फंडांनी 20% पर्यंत परतावा गुंतवणूकदारांना दिलेला आहे. या माध्यमातून तुम्ही सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात एसआयपीच्या माध्यमातून प्रत्येक दिवसाला शंभर रुपयांची बचत करून ते एसआयपी मध्ये गुंतवून सुरुवात करू शकता.

अशाप्रकारे तुम्ही शंभर रुपये दररोज वाचवू शकतात

दररोज शंभर रुपये वाचवणे फार जिकरीचे काम नाही. साधे आपण कुठे फिरायला गेलो तरी साधा नाश्ता किंवा चहा यामध्येच आपले शंभर रुपये सहज खर्च होतात. लोकांना धूम्रपान करायची सवय असते व असे लोक शंभर रुपये किमतीचे सिगरेट सहजपणे दिवसात पिऊन जातात. जर असा खर्च कमी केला व हे वाचलेले शंभर रुपये जर तुम्ही चांगल्या ठिकाणी किंवा एसआयपी मध्ये गुंतवले तर अशा प्रकारची दीर्घकालीन गुंतवणूक तुम्हाला करोडपती सहजपणे करून जाते.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts