Investment Tips : अलीकडच्या काळात गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. काहीजण सरकारी योजनांमध्ये म्हणजेच कोणतीही जोखीम नसणाऱ्या आणि जबरदस्त परतावा देणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. तर काहीजण शेअरमार्केटसारख्या जोखीम असणाऱ्या आणि निश्चित परतावा नसणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात.
जर तुम्ही गुंतवणूक करत असाल तर त्यापूर्वी त्या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घ्या. तसेच काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. नाहीतर तुम्ही कष्टाने कमावलेले पैसे वाया जाऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला खूप मोठा आर्थिक फटका बसू शकतो. कसे ते जाणून घ्या.
तज्ञांच्या मतानुसार, आता तुम्ही कोणत्याही गुंतवणूक योजना किंवा बँक खाते इत्यादींमध्ये नॉमिनी जोडणे खूप गरजेचे आहे. कारण जर तुम्ही असे केले तर तुमची गुंतवणूक सुरक्षित राहते. समजा जरी एखादी दुर्घटना घडली तरी तुमचे पैसे योग्य हातात जातात.
योग्य नॉमिनीची निवड करा
ज्यावेळी तुम्ही कुठेही पैसे गुंतवण्यास सुरुवात करता त्यावेळी तुम्ही त्यासोबत एक नॉमिनी जोडणे खूप महत्त्वाचे आहे. कारण जीवनात काही खात्री नसते. जरा विचार करा, समजा तुम्ही कोणताही नॉमिनी जोडला नाही आणि दुर्दैवाने तुम्हाला काही झाले तर तुमच्या कष्टाने जमा केलेल्या पैशाचे आणि तुमच्या गुंतवणुकीचे काय होईल? त्यामुळे तुम्ही आधीच एखाद्याला नॉमिनी केले असल्यास तर गुंतवणुकीची रक्कम तुमच्या मुलांपर्यंत किंवा जीवन साथीदारापर्यंत पोहचू शकते. त्यामुळे नॉमिनीची निवड करताना चुकूनही गाफील राहू नये.
कोणाला नॉमिनी करता येते?
सर्वात अगोदर नॉमिनी म्हणजे काय ते समजून घ्या. वास्तविक नॉमिनी ही अशी व्यक्ती असते जी गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर त्याच्या मालमत्तेचा आणि गुंतवणुकीचा हक्क मिळतो. आता गुंतवणूकदार त्याच्या हयातीत त्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला, जोडीदाराला, पालकांना किंवा त्याच्या मुलांना नॉमिनी म्हणून निवडू शकतो.
इतकेच नाही तर, तुमच्या कुटुंबातील सदस्य नसतानाही तुमच्या जवळची आणि विश्वासार्ह असणारी कोणतीही व्यक्ती तुमची नॉमिनी होऊ शकते. इतकेच नाही तर की तुम्ही तुमच्या गुंतवणुकीसाठी नॉमिनी कधीही बदलता येतो. याचा अर्थ तुम्ही इतर कोणत्याही नामांकित व्यक्तीला देखील जोडता आणि काढता येते.
नॉमिनी का करावे?
समजा चुकून एखाद्या गुंतवणूकदाराचा मृत्यू झाला तर त्याची गुंतवणूक त्याच्या नॉमिनीला ट्रान्सफर केली जाऊ शकते. जर एखाद्या गुंतवणूकदाराने नॉमिनीची नियुक्ती पूर्वीच केली नसेल, तर कुटुंब किंवा कायदेशीर वारसांना मृत व्यक्तीच्या गुंतवणुकीचा आणि मालमत्तेचा वारसा मिळण्यासाठी कठीण प्रक्रियेतून जावे लागू शकते. तो नामनिर्देशित नसेल तर, त्याला त्याची स्थिती सिद्ध करणारे मृत्युपत्र, प्रमाणपत्र किंवा इतर कागदपत्रे सादर करावी लागू शकतात. अशा परिस्थितीमुळे संबंधितांसाठी विलंब आणि तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नसते.