आर्थिक

Investment Tips : पालकांनो.. तुमच्या मुलांना करोडपती बनवायचे असेल तर आजच करा ‘या’ ठिकाणी गुंतवणूक, मिळेल 7.1% व्याज

Investment Tips : अनेकजण पैसे कोठे गुंतवायचे या विचारात असतात. परंतु फक्त प्रश्न गुंतवणुकीचा नाही, तर जास्त परतावा देणाऱ्या योजनांचाही आहे. काही योजना जास्त परतावा देतात तर काही योजना कमी परतावा देतात. त्यामुळे अनेकांना कल आता जास्त परतावा देणाऱ्या योजनांकडे आहे.

तुम्ही आता सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेत गुंतवणूक करून तुमच्या मुलांचे भविष्य सुरक्षित करू शकता. यात 7.1% व्याज देण्यात येत आहे. जर तुम्ही यात गुंतवणूक केली तर तुम्हाला त्याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. परंतु या योजनेच्या काही अटी आहेत.

मुलाच्या नावाने सुरु करता येते खाते

जर तुम्हाला तुमच्या मुलांसाठी चांगला निधी जमवायचा असल्यास तुम्ही सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी या योजनेत गुंतवणूक करू शकता. कारण या योजनेत सध्या 7.1% वार्षिक व्याज देण्यात येत आहे. परंतु हे लक्षात घ्या की एका व्यक्तीला केवळ एका मुलाच्या नावाने खाते चालू करता येते.

समजा एखाद्याला दोन मुले असल्यास एका अल्पवयीन मुलाचे पीपीएफ खाते आई आणि दुसऱ्याचे वडील उघडू शकतात. दोन्ही पालकांना एकाच मुलाच्या नावाने अल्पवयीन पीपीएफ खाते सुरु करता येत नाही. एका आर्थिक वर्षात अल्पवयीन व्यक्तीच्या PPF खात्यासाठी कमीत कमी 500 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये ठेव मर्यादा लागू आहे.

या ठिकाणी चालू करा खाते उघडा

आता तुम्हाला कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये पीपीएफ खाते उघडता येते. समजा तुम्हाला बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये पीपीएफ खाते चालू करायचे असेल, एखादी व्यक्ती केवळ एकच पीपीएफ खाते चालू करू शकते. जर अल्पवयीन मूल 18 वर्षांचे झाले तर, खात्याची स्थिती अल्पवयीन वरून मोठ्यामध्ये बदलण्यासाठी तुम्हाला अर्ज द्यावा लागणार आहे. तसेच हे लक्षात घ्या की विशेष प्रकरणांमध्ये, 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतर खाते बंद करता येते. उदाहरणार्थ, जेव्हा मुलाच्या उच्च शिक्षणासाठी किंवा कोणत्याही रोगाच्या उपचारासाठी पैशाची गरज असेल तर.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts