आर्थिक

Investment Tips : लक्षात ठेवा हा फॉर्म्युला, मिळेल लाखो रुपायांचा परतावा; अशी करा गुंतवणूक

Investment Tips : अनेकजण चांगल्या परताव्यासाठी गुंतवणूक करतात. परंतु तुम्ही पैसा जमा करता त्यावेळी तुम्हाला तुमचा पैसा किती दिवसात चांगला परतावा देईल, त्यात किती जोखीम घ्यावी लागते? याची माहिती तुम्हाला असावी. प्रत्येक जण गुंतवणुक करण्यापूर्वी त्यांचे पैसे किती दिवसात डबल होईल, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात.

महत्वाचे म्हणजे काही योजनांमध्ये रक्कम जमा केल्यानंतर काही ठराविक कालावधीनंतर पैसे डबल होतात. परंतु काही योजनांमध्ये कमी कालावधीतही श्रीमंत होता येते. बदलत्या वेळेनुसार गुंतवणुकीच्या पद्धतीतही खूप मोठे बदल झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही हा अप्रतिम फॉर्म्युला लक्षात ठेवून गुंतवणूक केली तर तुम्हाला लाखो रुपयांचा फायदा होईल.

लक्षात ठेवा 15x15x15 हा फॉर्म्युला

आता तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात घेऊन 15 वर्षांसाठी 15,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. या गुंतवणुकीवर तुम्हाला 15 टक्के दराने व्याज मिळेल. 15 वर्षांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला 1 कोटी रुपयांचा परतावा मिळेल. यात एकूण 27 लाख रुपयांची गुंतवणूक होणार आहे.तर त्याच वेळी व्याज म्हणून 73 लाख रुपये तुम्हाला परतावा म्हणून मिळतील.

जाणून घ्या गुंतवणुकीचा कालावधी

समजा तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये प्रत्येक महिन्याला SIP मध्ये गुंतवणूक केल्यास तर तुम्हाला म्युच्युअल फंडांमध्ये, परतावा 12% पर्यंत असेल. आता या ठिकाणी तुम्हाला एकूण 20 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागणार आहे. जर तुम्ही 20 वर्षामध्ये यात गुंतवणूक केली तर तुमची एकूण गुंतवणूक 24 लाख रुपये इतकी होईल.

इतकेच नाही तर तुम्हाला यावर व्याज म्हणून 74.93 हजार रुपये मिळणार आहेत. त्यामुळे हे लक्षात ठेवा की SIP चे एकूण मूल्य 98.93 लाख रुपयांपर्यंत असणार आहे. ज्यात तुम्हाला केवळ व्याजातून 74.93 लाख रुपये मिळाले आहेत.

चक्रवाढ व्याज

चक्रवाढीची शक्ती अशा प्रकारे समजून घ्या की तुम्हाला कुठेही गुंतवणूक करता येईल आणि जे काही कमावले ते पुन्हा गुंतवले तर चक्रवाढ होईल. यात मुद्दलासोबत व्याजावरही व्याज मिळेल. कंपाउंडिंग हा तुमची गुंतवणूक वाढवण्याचा सर्वात चांगला पर्याय आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts