आर्थिक

Investment Tips : मुलीचे आर्थिक भविष्य सुधारण्यासाठी दरवर्षी करा फक्त ‘एवढीच’ गुंतवणूक…

Investment Tips : तुम्हालाही तुमच्या तुमच्या मुलीच्या उज्वल भविष्यासाठी गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही सुकन्या समृद्धी खात्यात गुंतवणूक करू शकता. येथील गुंतवणूक तुमच्या मुलीला करोडपती बनवू शकते.

या योजनेत जर आई-वडील किंवा पालकांनी दरवर्षी मुलीच्या नावावर 50,000 रुपये जरी गुंतवले, तर मुलगी मोठी झाल्यावर म्हणजेच योजनेच्या मॅच्युरिटीवर मुलीच्या खात्यात लाखो रुपये जमा होतील.

केंद्र सरकारकडून चालवण्यात येत असलेली ही योजना बऱ्यापैकी सुरक्षित मानली जाते. खात्यात जमा केलेले भांडवल शिक्षणासाठी किंवा मुलीच्या लग्नासाठीही वापरले जाऊ शकते. कारण त्यात चांगले व्याजही मिळते.

सुकन्या समृद्धी खाते मुलीच्या जन्मानंतरच मुलीच्या नावाने उघडता येते. यामध्ये दहा वर्षांखालील मुलींच्या नावानेच खाते उघडता येईल. गुंतवणूकदारांना 15 वर्षे सतत गुंतवणूक करावी लागते. मुलगी १८ वर्षांची झाल्यावर खात्यातून काही रक्कम काढता येते. मात्र वयाची २१ वर्षे पूर्ण झाल्यानंतर सुकन्या समृद्धी खात्यातून संपूर्ण रक्कम काढता येते. खात्यातून काढलेली संपूर्ण रक्कम करमुक्त आहे.

तुम्हाला किती व्याज मिळते?

सुकन्या समृद्धी खात्यावर सरकार ८ टक्के व्याज देते

लाखो रुपयांचे रिटर्न कसे मिळवायचे?

मुलगी पाच वर्षांची असतानाही गुंतवणूकदारांनी गुंतवणूक सुरू केली, तर त्यांना पुढील १५ वर्षे सतत गुंतवणूक करावी लागेल. जर तुम्ही 2024 मध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली तर तुम्हाला 2039 पर्यंत दरवर्षी किमान पन्नास हजार रुपये गुंतवावे लागतील. या कालावधीत एकूण 7,50,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. ज्यामध्ये 14,94,845 रुपये व्याज म्हणून मिळतील.

मॅच्युरिटीवर मिळतील लाखो रुपये

18 वर्षे पूर्ण झाल्यावर, मुलीच्या खात्यात 14,94,845 रुपये व्याज आणि 7,50,000 रुपयांच्या मुद्दलासह 22,44,845 रुपये परत मिळतील.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts