आर्थिक

Investment Tips : तुम्हीही मुदतपूर्तीपूर्वीच काढत असाल पैसे तर तुम्हालाही भरावा लागणार ‘इतका’ दंड, गुंतवणुकीपूर्वी जाणून घ्या नियम आणि अटी

Investment Tips : अनेकांना गुंतवणूक करण्याची सवय असते, त्यापैकी अनेकजण ज्या योजनेत सुरक्षित आणि चांगला परतावा मिळत आहे त्या योजनेमध्ये गुंतवणूक करत आहेत. जर तुम्ही एखाद्या योजनेत गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला त्या योजनेची संपूर्ण माहिती असावी.

जर तुम्हाला त्या योजनेची अर्धवट माहिती माहित असेल तर तुम्हाला याचा फटका बसू शकतो. अनेकजण मुदतपूर्तीपूर्वीच पैसे काढत असतात त्यामुळे त्यांना दंड भरावा लागतो. जर तुम्हाला हा दंड टाळायचा असेल तर तुम्हाला नियम आणि अटी जाणून घेणे गरजेचे आहे.

सध्या प्री-मॅच्युरिटीपूर्वी पैसे काढल्याने अनेक प्रकारचे शुल्क आकारले जाते, त्यामुळे ग्राहकांना तोटा सहन करावा लागत आहे. अशातच जर तुम्हीही प्री-मॅच्युरिटीपूर्वी पैसे काढणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना

जर तुम्ही एक वर्षापूर्वी खाते बंद केले तर त्यावर कोणतेही व्याज देण्यात येणार नाही.
समजा तुम्ही एक वर्षानंतर आणि दोन वर्षापूर्वी खाते बंद केले तर, मूळ रकमेच्या 1.5% इतकी रक्कम कापण्यात येईल.
खाते दोन वर्षांनंतर आणि 5 वर्षापूर्वी बंद केले तर, मूळ रकमेच्या 1% इतकी रक्कम कापण्यात येईल.
तसेच तुमच्याकडे विस्तारित खाते असेल तर, तुम्ही एका वर्षानंतर कोणत्याही कपातीशिवाय खाते बंद करू शकता.

पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव

तुम्हाला या योजनेत खाते उघडल्यानंतर 3 वर्षांनीच पैसे काढता येतात. त्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पैसे काढण्यासाठी अर्ज करावा लागतो. या योजनेत, ग्राहकाला केवळ पोस्ट ऑफिस बचत खात्यासाठी लागू होणारा व्याजदर दिला जातो.

पोस्ट ऑफिस मुदत ठेव

  • गुंतवणूकदारांना 6 महिन्यांनंतरच त्यांची रक्कम काढता येतात.
  • तसेच जर तुम्ही पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट सहा महिन्यांनंतर किंवा एक वर्षापूर्वी बंद केले तर, तुम्हाला पोस्ट ऑफिस बचत खात्याचा त्या वेळी लागू होणारा व्याज दर मिळू शकतो. 2023 च्या एप्रिल-जून तिमाहीसाठी बचत खात्याचा व्याज दर 4 टक्के इतका आहे.
  • जर तुम्ही 3-वर्षांचे POTD किंवा 5-वर्षांचे POTD खाते एका वर्षानंतर अकाली बंद केल्यास त्या व्याजाची गणना संपूर्ण वर्षांसाठी (म्हणजे दोन किंवा तीन वर्षांसाठी) ठेव व्याजदरापासून 2% ने कमी होईल) तसेच बचत व्याजदर एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी लागू होईल.

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न

तुम्हाला या योजनेत 1 वर्षानंतरच निधी काढता येते. जर तुम्ही खाते उघडण्याच्या तारखेपासून एक वर्षानंतर आणि तीन वर्षापूर्वी खाते बंद केले तर, मुद्दलाच्या 2% इतकी वजावट करण्यात येईल. तुम्हाला उरलेली रक्कम देण्यात येईल. तर दुसरीकडे, खाते उघडण्याच्या तारखेपासून तीन वर्षांनंतर आणि पाच वर्षापूर्वी खाते बंद केले तर, मुद्दलाच्या 1% इतकी वजावट करण्यात येईल.

राष्ट्रीय बचत योजना प्रमाणपत्र

तुम्हाला या योजनेत 5 वर्षांसाठी निधी काढता येत नाही. कारण त्यासाठी काही अटी आहेत. समजा एकल खातेदार किंवा संयुक्त खातेदारांपैकी एकाचा मृत्यू झाल्यास तुम्ही पैसे काढू शकता. न्यायालयाच्या आदेशानुसार किंवा गहाण ठेवणारा राजपत्रित अधिकारी असल्याने तुम्हाला निधी परत मिळतो.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts