FD Interest Rates : जर तुम्ही या महिन्यात एफडी करण्याचा विचार करत असाल तर ही संधी तुमच्यासाठी खूप चांगली आहे. नुकतीच चार मोठ्या बँकांनी त्यांच्या मुदत ठेवींवरील व्याजात वाढ केली आहे. यामध्ये उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक, सिटी युनियन बँक, आरबीएल बँक आणि कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक यांचा समावेश आहे.
खरं तर बँकांमधील कर्जाची उचल ही ठेवीपेक्षा जास्त आहे. तसेच, गुंतवणूकदार चांगले परतावा देणाऱ्या गुंतवणुकीत त्यांचे पैसे गुंतवत आहेत, त्यामुळे बँकांवर व्याजदर वाढवण्याचा दबाव आहे.
बँकांमधील ठेवी कमी होण्याचा दबाव या वर्षाच्या तिसऱ्या किंवा चौथ्या तिमाहीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, गुंतवणूकदार या काळात आपल्या एफडीवर जास्त व्याजाचा लाभ घेऊ शकतात. मात्र एफडी करताना हे लक्षात ठेवा की केंद्र सरकारने सर्व लहान आणि मोठ्या बँकांच्या ठेवींवर 5 लाख रुपयांची हमी देण्याची तरतूद केली आहे. म्हणजेच तुमची 5 लाख रुपयांपर्यंतची ठेव सुरक्षित राहील.
एफडीवर सर्वाधिक परतावा देणाऱ्या चार बँका!
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक
बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात बदल केला आहे. नवीन दर 1 मे एप्रिल 2024 पासून लागू झाले आहेत. त्यानुसार सर्वसामान्य नागरिकांसाठी बँकेचा व्याजदर ४ टक्के ते ८.५० टक्के आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी बँकेचे व्याजदर 4.60 टक्के ते 9.10 टक्के दरम्यान आहेत. 2 ते 3 वर्षांच्या कालावधीच्या FD वर सर्वाधिक व्याजदर उपलब्ध आहेत. हा व्याजदर 8.50 टक्के ते 9.10 टक्के दरम्यान आहे.
सिटी युनियन बँक
बँकेचे नवीन व्याजदर 6 मे 2024 पासून लागू होणार आहेत. सिटी युनियन बँक एफडी दर सामान्य नागरिकांसाठी 5 टक्के ते 7.25 टक्के दरम्यान व्याजदर देत आहेत, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 5 टक्के ते 7.75 टक्के दरम्यान आहे. बँक 400 दिवसांच्या FD वर सर्वाधिक व्याजदर देत आहे.
आरबीएल बँक
बँकेने 18 ते 24 महिन्यांच्या FD साठी 8 टक्के व्याज दर निश्चित केला आहे. ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अतिरिक्त व्याज मिळत आहे तर 80 वर्षांवरील नागरिकांना 0.75 टक्के अतिरिक्त व्याज द्यावे लागणार आहे.
कॅपिटल बँक स्मॉल फायनान्स बँक
बँक (कॅपिटल बँक स्मॉल फायनान्स बँक) सामान्य नागरिकांसाठी 3.5 टक्के ते 7.55 टक्के व्याजदर देत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ४ टक्के ते ८.०५ टक्के व्याजदर आहे. सर्वाधिक व्याज दर 400 दिवसांच्या कालावधीसाठी आहे. नवीन दर 6 मे 2024 पासून लागू होणार आहेत.