आर्थिक

शेअर असावा तर असा ! 3 रुपयाचा स्टॉक पोहोचला 123 रुपयांवर, गुंतवणूकदारांवर पडला पैशांचा पाऊस, तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये आहे का?

Share Market News : शेअर मार्केट ही अशी विहीर आहे ज्यांमधील पाणी (पैसे) संपूर्ण जगाची तहान भागवू शकते. हा डायलॉग तुम्ही ऐकला असेलच. दरम्यान शेअर बाजारातील एका कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांची पैशाची तहान भागवली आहे. वास्तविक शेअर बाजारात जे लोक गुंतवणूक करतात त्यांना तज्ञ लोक लॉन्ग टर्म मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. लॉन्ग टर्म मध्ये गुंतवणूक केली तर शेअर बाजारातून चांगला परतावा मिळतो.

किमान पाच वर्षांच्या काळासाठी जर एखाद्या योग्य स्टॉक मध्ये गुंतवणूक केली तर गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळू शकतो. आज आपण अशाच एका स्टॉक बाबत जाणून घेणार आहोत ज्याने पाच वर्षांच्या काळात तब्बल 3546% रिटर्न दिले आहेत. कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही मात्र पाच वर्षांपूर्वी जो स्टॉक बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर तीन रुपयांवर ट्रेड करत होता तो आज तब्बल 123 रुपयांवर पोहोचला आहे. यामुळे या स्टॉक मध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार पाच वर्षांच्या काळात चांगलेच मालामाल बनले आहेत.

कोणता आहे तो स्टॉक

हा स्टॉक आहे अवांटेल लिमिटेडचा. ही कंपनो संरक्षण क्षेत्रातील आहे. या कंपनीने पाच वर्षांच्या काळात चांगलीच चमकदार कामगिरी केली आहे. हा स्टॉक केवळ 5 वर्षात 3.38 रुपयावरून 123.25 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला जबरदस्त परतावा दिला आहे. विशेष म्हणजे ज्या गुंतवणूकदारांनी या स्टॉक मध्ये दोन वर्षांपूर्वी विश्वास दाखवून चांगली गुंतवणूक केली असेल तर त्यांना देखील चांगला परतावा मिळाला आहे.

कारण की हा स्टॉक दोन वर्षात जवळपास 1000 टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे ज्या लोकांनी दोन वर्षांपूर्वी देखील गुंतवणूक केली असेल ते देखील श्रीमंत झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी म्हणजे नोव्हेंबर 2021 मध्ये हा स्टॉक 11 रुपयांच्या आसपास व्यवहार करत होता. पण 30 नोव्हेबर 2023 ला हा स्टॉक 123.25 रुपयांवर पोहोचला. म्हणजे या दोन वर्षांच्या काळात हा स्टॉक जवळपास 1,000% परतावा देऊन गेला आहे.

5 वर्षांच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर डिसेंबर 2018 मध्ये हा स्टॉक तीन रुपये आणि 38 पैशावर ट्रेड करत होता मात्र आता हा 123.25 रुपयांवर ट्रेड करत आहे. म्हणजे या कालावधीत 3546% एवढे रिटर्न या स्टॉकने दिले आहेत. गेल्या एका वर्षात या स्टॉकमध्ये 312% एवढी वाढ झाली आहे तसेच या चालू वर्षात आत्तापर्यंत 382.20% एवढी वाढ नमूद करण्यात आली आहे.

एकंदरीत या स्टॉक मध्ये गेल्या पाच वर्षांपूर्वी किंवा दोन वर्षांपूर्वी ज्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली असेल त्यांना चांगला परतावा मिळाला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी एका वर्षांपूर्वी देखील यामध्ये गुंतवणूक केली असेल त्यांना देखील या स्टॉकने चांगले रिटर्न दिले आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts