आर्थिक

KCC : SBI मध्ये खाते उघडणाऱ्यांना सरकार देत आहे 3 लाख रुपये, काय आहे योजना? जाणून घ्या…

KCC : शेती करताना शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकाकडून अनेक योजना राबवल्या जातात. ज्याचा लाभ देशातील आज करोडो शेतकरी घेत आहेत. तुम्हीही या योजनांचा लाभ घेऊ शकता.

यातील अशा काही योजना आहेत ज्याची माहिती शेतकऱ्यांना नसते. जर तुम्ही SBI मध्ये उघडले तर तुम्हाला सरकाकडून एकूण 3 लाख रुपयांचा फायदा होईल. किसान क्रेडिट कार्ड असे या योजनेचे नाव आहे. काय आहे योजना जाणून घ्या.

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या मतानुसार, किसान क्रेडिट कार्ड योजनेचा एकमेव उद्देश हा आहे की शेतकऱ्यांना त्यांच्या शेती आणि इतर गरजांसाठी बँकिंग प्रणालीद्वारे कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देणे. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आजच जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन किसान क्रेडिट कार्ड खाते उघडा. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस पोस्ट ऑफिसमध्ये योजनेअंतर्गत खाते उघडण्यात येत आहे.

4 टक्के व्याजाने मिळवा कर्ज

शेतकर्‍यांना शेतीची कामे पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी कमी व्याजदरात आणि सोप्या पद्धतीने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड योजना राबवली जात आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना कमीत कमी 7 टक्के व्याजदराने 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेता येईल. आनंदाची बाब म्हणजे वेळेत कर्ज परत करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार व्याजदरात एकूण 3 टक्क्यांची सवलत देत आहे. अशा प्रकारे योजनेंतर्गत घेतलेल्या कर्जावर फक्त 4 टक्के व्याज द्यावे लागणार आहे.

या कामांसाठी मिळेल कर्ज

देशातील प्रत्येक शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ देण्यात येत आहे. या अर्जासाठी 18 ते 75 वर्षे वयोमर्यादा निश्चित केली आहे. या योजनेंतर्गत खते, बियाणे, कृषी यंत्रे, मत्स्यपालन, पशुपालन यासह अनेक प्रकारच्या शेतीशी निगडित कामांसाठी कर्ज देण्यात येते.

असा करा अर्ज

जर तुम्हाला KCC या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्जदार शेतकऱ्याला PM किसान पोर्टलवरून सर्वात अगोदर KCC फॉर्म डाउनलोड करावा लागणार आहे. आधारकार्ड, पॅनकार्ड आणि त्याचे एक छायाचित्र तसेच अर्जदाराने शेतीची कागदपत्रे आणि त्याची माहिती फॉर्ममध्ये टाकावी लागणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या जवळच्या शाखेत जमा करून खाते उघडावे लागणार आहे. बडोदा किंवा इतर कोणत्याही बँकेची त्यानंतर कर्जाची रक्कम संबंधित खात्यात हस्तांतरित करण्यात येईल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts