आर्थिक

मोबाईलच्या एसएमएसकडे लक्ष ठेवा! लाडक्या बहिण योजनेचे पैसे कोणत्याही क्षणी बँक खात्यात जमा होण्याची शक्यता; जाणून घ्या माहिती

Majhi Ladki Bahin Yojana:- महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूपच प्रसिद्ध आणि महत्त्वाची अशी योजना असून या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांच्या खात्यावर प्रति महिना पंधराशे रुपये जमा केले जातात. आतापर्यंत जर या योजनेची स्थिती बघितली तर जवळपास 7500 रुपये या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत.

तसेच विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अडकू नये याकरिता ऑक्टोबर महिन्यातच दोन्ही महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आले होते.

परंतु आता राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्यावर नवीन सरकार स्थापन झाले आहे व महत्वाचे म्हणजे या सरकारचे कामकाज देखील आता सुरू झाले असून मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खाते वाटप देखील करण्यात आले आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर मात्र आता डिसेंबर महिन्याचा हप्ता बँकेत कधी जमा होणार याकडे मात्र लाडक्या बहिणीचे लक्ष लागून राहिले आहे.

डिसेंबर महिन्याचा हप्ता कोणत्याही क्षणी बँकेत होणार जमा
नुकतेच पार पडलेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती देताना सांगितले की, डिसेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो हे अधिवेशन संपल्यावर देण्यात येईल अशा प्रकारची ग्वाहीच त्यांनी दिली.

तसेच राज्यातील शेतकरी, युवावर्ग व ज्येष्ठ नागरिक तसेच वंचित घटकाला दिलेली जी काही आश्वासने होती ती देखील पूर्ण केले जातील व शासनाच्या सुरू असलेल्या योजना बंद होऊ देणार नाही असे देखील त्यांनी या निमित्ताने बोलताना म्हटले.

काल म्हणजेच 21 डिसेंबर 2024 रोजी नागपूर येथे सुरू असलेले विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपले व आता देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तसेच बऱ्याच प्राप्त अर्जांची छाननी ही विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे बाकी होती. आता या निवडणुकांची सगळी प्रक्रिया पार पडली आहे व आता या योजनेचे जे काही अर्ज प्रलंबित आहे त्यांची छाननी आता पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

यामध्ये ज्यांनी अर्ज केलेले आहेत परंतु त्यांना अजून पर्यंत या योजनेचा लाभ मिळालेला नाही अशांनी त्यांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक आहे की नाही हे पाहणे गरजेचे आहे. तुमचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असेल तरच या योजनेचे पैसे मिळू शकणार आहेत. त्यामुळे बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य आहे.

बँक खात्यासोबत आधार कार्ड लिंक आहे की नाही हे अशा पद्धतीने तपासा

1- बँक खात्यासोबत आधार कार्ड लिंक आहे की नाही हे तपासण्या करतात तुम्ही सगळ्यात अगोदर https://uidai.gov.in या लिंक वर क्लिक करावे.

त्यानंतर आधार लिंकिंग स्टेटस यावर क्लिक करावे.

3- त्यानंतर बँक सीडींग स्टेटस हा एक पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करावे.

4- त्यानंतर तुमचा आधार नंबर आणि कॅपच्या कोड इंटर करावा आणि आलेल्या ओटीपीच्या साह्याने लॉगिन करा.

5- त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आधार कार्ड सोबत तुमचे कोणते बँकेचे खाते लिंक आहे याची माहिती दिसून येते.

6- परंतु जर अर्जासोबत दिलेले बँक खाते त्यामध्ये आले नसेल तर बँकेत भेट देऊन बँक खात्यासोबत आधार कार्ड लिंक करून घ्यावे.

या योजनेच्या निकषांमध्ये बदल होणार का? धाकधुक वाढली
माझी लाडकी पण योजनेचे जेव्हा अर्ज सादर करण्यात आले तेव्हा काही निकष लावण्यात आलेले होते. जसे की एका कुटुंबात दोन महिलांनाच लाभ दिला जाणार, आयकर भरणारे यांना लाभ घेता येत नव्हता. परंतु अर्ज यशस्वी भरणा झाल्यानंतर मात्र पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होत होती.

परंतु यामध्ये काही ठिकाणी दोनपेक्षा जास्त महिलांना लाभ देण्यात आल्याचा आणि आयकर भरणा करणाऱ्या कुटुंबातील महिलांनी देखील लाभ घेतला असल्याचा आरोप केला जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर या योजनेच्या निकषांमध्ये बदल होणार असल्याचे चर्चा रंगल्याचे देखील आपण बघितले. परंतु अद्याप पर्यंत मात्र निकष बदलाविषयी प्रशासनाला कोणतेही आदेश नाहीत. परंतु तरीदेखील धाकधूक लागलेली आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts