आर्थिक

Kisan Loan Portal: शेतकऱ्यांना कर्ज मिळणे झाले खूप सोपे! सरकारने आणले नवीन पोर्टल, वाचा माहिती

Kisan Loan Portal:- केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळेवर पैसा मिळावा व शेतीची कामे अगदी वेळेत पूर्ण व्हावी यासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. शेतकऱ्यांसाठी वेळेवर कर्ज उपलब्ध होणे हे पीक उत्पादन वाढीसाठीची एक महत्त्वाची बाब आहे. कारण जर आपण बँकांचा विचार केला तर शेतकऱ्यांना बँक वेळेवर कर्ज पुरवठा करत नाही व कायमच आडमुठी भूमिका घेत असल्यामुळे त्यांना बऱ्याचदा खाजगी सावकारांच्या दाराशी जावे लागते व एकदा का शेतकरी या फेऱ्यात अडकला तर कर्जाच्या विळख्यात शेतकरी पूर्ण अडकतात.

या सगळ्या पार्श्वभूमीवर  केंद्र सरकारच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना किसान क्रेडिटच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देण्यात येते व या माध्यमातून मिळणारे कर्ज अतिशय सोप्या पद्धतीने शेतकऱ्यांना मिळावे व त्यासोबतच इतर अनुदानित कर्ज देखील शेतकऱ्यांना सोप्या पद्धतीने उपलब्ध व्हावे याकरिता आता नवीन पोर्टल सरकारने आणले असून या साहाय्याने आता बँका शेतकऱ्यांच्या दारात जाऊन कर्ज देतील अशी एकंदरीत योजना आखण्यात आलेली आहे व हे कर्ज किसान क्रेडिट कार्डवर दिले जाईल.

केंद्र सरकारच्या माध्यमातून किसान कर्ज पोर्टल लाँच करण्यात आले असून हे आता अनेक सरकारी विभागांच्या सहकार्याने काम करणारा असून या माध्यमातून ते विकसित करण्यात आलेले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा डेटा तसेच कर्ज वाटपाची माहिती व व्याज सवलत आणि योजनेची प्रगतीची माहिती मिळू शकणार आहे.

 पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी देखील होईल मदत

किसान क्रेडिट कार्ड कर्ज खातेधारकांशी संबंधित माहिती आता या पोर्टलवर सहजपणे उपलब्ध होणार आहे. तसेच सर्व किसान क्रेडिट कार्ड खातेधारकांची पडताळणी देखील आता आधारच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्यास देखील या माध्यमातून मदत मिळू शकते. एवढेच नाही तर या माध्यमातून थेट पात्र लाभार्थींना व्याज सवलतीच्या दाव्यांचे पेमेंट पाठवण्याची देखील योजना आहे.

या पोर्टलच्या माध्यमातून सरकारला योजनांचे लाभार्थी आणि थकीत शेतकऱ्यांचे मूल्यांकन करता येणार आहे. या माध्यमातून आता केवळ किसान क्रेडिट कार्ड कर्जासाठी अर्ज करू शकणार नाही तर पीक जोखीम कमी करणे आणि आपत्ती जोखीम कमी करण्याच्या उपायांची माहिती आणि विमा संबंधित चालवल्या जाणाऱ्या नॉन प्लांट पॅरा मॅट्रिक माहिती देखील या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे.

 शेतकऱ्यांच्या घरापर्यंत जाऊन राबवली जाणार मोहीम

किसान क्रेडिट कार्डचे फायदे शेतकऱ्यांना वाढावेत याकरिता सरकार घरोघरी जाऊन मोहीम राबवणार असून या माध्यमातून पी एम किसान योजनेचे जे काही लाभार्थी शेतकरी आहेत त्यांना आणि इतर शेतकरी यांना जोडले जाणार आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते

व किसान क्रेडिट कार्ड च्या माध्यमातून सवलतीच्या दरामध्ये शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते. या अंतर्गत शेतकऱ्यांना तीन ते चार टक्के दराने कर्ज मिळते व पन्नास हजार रुपयांच्या कर्जावर प्रक्रिया शुल्क देखील लागू होत नाही. हे कर्ज शेतकऱ्यांना कृषीसाठी आवश्यक उपकरणे खरेदी तसेच शेती व शेतीचे संबंधित कामासाठी दिले जाते.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts