आर्थिक

Kotak Mahindra Bank: कोटक महिंद्रा बँक देईल तुम्हाला 40 लाख रुपयापर्यंत पर्सनल लोन! वाचा ए टू झेड माहिती

Kotak Mahindra Bank:- अचानकपणे जर आपल्याला आर्थिक गरज उद्भवली जसे की घरामध्ये अचानकपणे हॉस्पिटलचा खर्च किंवा लग्न समारंभ, घराची दुरुस्ती अशा कारणांमुळे अचानकपणे मोठ्या प्रमाणावर पैशांची गरज भासते. अशावेळी जेवढा पैसा लागणार असतो तितकी बचत किंवा तेवढा पैसा आपल्या बँक खात्यात असेल असे होत नाही.

त्यामुळे बरेच व्यक्ती मित्र तसेच नातेवाईक यांच्याकडून उसने किंवा व्याजाने पैसे घेतात किंवा एक तर बँकेच्या माध्यमातून वैयक्तिक कर्ज म्हणजेच पर्सनल लोनचा आधार घेतला जातो.

पर्सनल लोनच्या बाबतीत पाहिले तर प्रत्येक बँक पर्सनल लोन देत असतात व प्रत्येक बँकेचे नियम आणि व्याजदर हे वेगवेगळे असतात. त्यामुळे आपल्याला परवडेल अशाच बँकेतून पर्सनल लोन घेण्यासाठी प्रयत्न केला जातो. याच अनुषंगाने आपण या लेखामध्ये कोटक महिंद्रा बँकेकडून देण्यात येणाऱ्या पर्सनल लोन विषयीची ए टू झेड माहिती घेणार आहोत.

 कोटक महिंद्रा बँकेतून घेता येते 40 लाख रुपये पर्यंत पर्सनल लोन

कोटक महिंद्रा बँकेच्या माध्यमातून तुम्हाला चाळीस लाख रुपये पर्यंत पर्सनल लोन मिळू शकते व ते तुम्हाला साधारणपणे वार्षिक 10.99% दराने मिळते. कोटक महिंद्रा बँकेकडून अनेक सुविधा या माध्यमातून दिले जातात.जसे की, बँकेच्या माध्यमातून अंशीक प्री पेमेंटची सुविधा देखील केली जाते आणि कर्ज घेण्यासाठी कमीत कमी कागदपत्रे द्यावी लागतात.

कोटक महिंद्रा बँक ही भारतातली प्रमुख व्यावसायिक बँक असून महानगरांमध्ये ताबडतोब वैयक्तिक कर्ज देण्यासाठी ही बँक प्रसिद्ध आहे.

 कोटक महिंद्रा बँकेकडून पर्सनल लोन घेण्याचे प्रमुख फायदे

1- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला कोटक महिंद्र बँकेकडून सुट्टी साठी आर्थिक मदत किंवा लग्नासाठी पैसे, घराचे नूतनीकरण करणे किंवा कर्ज एकत्र करणे इत्यादी कामाकरिता वैयक्तिक कर्ज पटकन मिळते.

2- कोटक महिंद्रा बँकेकडून पर्सनल लोन साठी तुम्हाला फक्त एक सोपी आणि सोयीस्कर अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागते आणि कर्जाचा अर्ज सबमिट केल्यानंतर काही दिवसात यासंबंधीचा निर्णय बँकेकडून घेतला जातो. म्हणजेच बँकेची यासंबंधीची प्रक्रिया अतिशय जलद आणि सोपी आहे.

3- तसेच कोटक महिंद्रा बँकेकडून घेतलेल्या कर्जावर बँकेकडून स्पर्धात्मक व्याजदर देण्यात येतो. त्यामुळे ग्राहकांना कर्ज घेण्यासाठी एक आकर्षक पर्याय उपलब्ध होतो.

4- तसेच पर्सनल लोन परतफेडीचा खूप लवचिक कालावधी बँक ऑफर करते. ज्यामुळे कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला सोयीचा पडेल आणि परवडणारा असा परतफेड कालावधी निवडता येतो.

5- तसेच परतफेड ही सुलभ आणि अधिक सोयीस्कर बनवण्यासाठी बँक तुमच्या बँक खात्यातून ऑटोमॅटिक म्हणजेच स्वयंचलित मासिक पेमेंट सेट करण्याच्या पर्यायासह परतफेडीच्या अनेक पर्यायांची ऑफर देते.

 महिंद्रा बँक पर्सनल लोन साठी आवश्यक कागदपत्र

1- ओळखीचा पुराव्यासाठी तुम्हाला आधार तसेच पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यासारख्या सरकारने जारी केलेल्या आयडीची आवश्यकता भासते.

2- राहण्याच्या पुराव्यामध्ये इलेक्ट्रिसिटी  बिल, पासपोर्ट तसेच आधार कार्ड, बँक स्टेटमेंट किंवा तुमच्या वर्तमान पत्ता दर्शवणारा भाडेकरार यामध्ये लागतो.

3- उत्पन्नाच्या पुराव्यामध्ये तुम्ही तुमची मिळकत आणि नोकरीची स्थिती दर्शवण्यासाठी सॅलरी स्लिप तसेच बँक स्टेटमेंट किंवा आयकर रिटर्न देऊ शकतात.

4- त्यासोबतच बँकेला तुमची आर्थिक प्रोफाइल कळावी आणि तुमचे क्रेडिटची पात्रता काय आहे याचे मूल्यांकन करता यावे म्हणून बँक स्टेटमेंट किंवा मालमत्तेचा पुरावा यासारख्या अतिरिक्त कागदपत्रांची मागणी बँक करू शकते.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts