आर्थिक

Post Office : पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना बनवेल लखपती, आताच करा गुंतवणूक…

Post Office : जर तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करायची असेल तर आज आम्ही पोस्टाची अशी एक स्कीम घेऊन आलो आहोत, ज्याअंतर्गत गुंतवणूक करून तुम्ही दीर्घकाळात चांगला निधी उभा करू शकता. आम्ही पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजनेबद्दल बोलत आहोत. या योजनेत तुम्ही 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षे आणि 5 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता.

आज आपण पोसटच्या मुदत ठेवींमध्ये वेगवेगळ्या कालावधीसाठी गुंतवणूक केली तर किती फायदा होईल या बद्दल जाणून घेणार आहोत. या योजनेत कालावधीनुसार ग्राहकांना व्याज दिले जातात.

जर तुम्ही 1 लाख रुपये 1 वर्षासाठी जमा केल्यास तुम्हाला 6.9 टक्के व्याज मिळते, आणि जर तुम्ही 2 वर्षांसाठी FD केल्यास 7.00 टक्के व्याज, तर 3 वर्षांसाठी 7.10 टक्के आणि 5 वर्षांसाठी मुदत ठेव ठेवल्यास 7.5 टक्के व्याज मिळते.

पोस्ट ऑफिस एफडी योजनेअंतर्गत खाते उघडताना, गुंतवणूकदार/ग्राहक आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार किमान 1000 रुपयांचे एफडी खाते उघडू शकतात. या योजनेत तुम्ही किंमत 1000 रुपये ते जास्तीत जास्त लाख, कोटी रुपये जमा करू शकता.

यामध्ये एकापेक्षा जास्त FD खाती उघडण्याची देखील सुविधा आहे. तसेच तुम्ही 5 वर्षांच्या मुदत ठेवीवर FD खाते मुदतीपूर्वी बंद करू शकता. या योजनेत भारतात राहणारे सर्व स्त्री-पुरुष सहज एफडी खाते उघडू शकतात, यात कोणतेही बंधन नाही. लक्षात ठेवा की तुमचे 10 वर्षांचे अल्पवयीन मूल किंवा 10 वर्षांची मुलगी असली तरी तुम्ही FD खात्यात पैसे जमा करू शकता.

सर्वसामान्य नागरिक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोमर्यादा काही फरक पडत नाही, तुम्ही तुमच्या सोयीनुसार जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडून पैसे जमा करू शकता.

यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे : 

-मुलाचे वय 10 वर्षांपेक्षा जास्त असल्यास जन्म प्रमाणपत्र

-आधार कार्ड सोबत ठेवावे

-मोबाईल नंबर आवश्यक असेल

-आवश्यक असल्यास, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र नक्कीच सोबत ठेवा.

-पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts