आर्थिक

LIC Policy : मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाचे टेन्शन सोडा ! LIC ची ‘ही’ पॉलिसी देईल त्यासाठी पैसे

LIC Policy : एलआयसी आपल्या ग्राहकांना वेळोवेळी खास प्लॅन ऑफर करते. जेणेकरून लोकांना स्वत:चे आणि मुलांचे भवितव्य सुरक्षित करता येईल. या प्रक्रियेत एलआयसीची एक योजना लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

ज्याचे नाव आहे जीवन तरुण पॉलिसी.ही पॉलिसी विशेष करून मुलांसाठी तयार करण्यात आली आहे. जेणेकरून मुले आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतील.

एलआयसीच्या या पॉलिसीबद्दल सविस्तर जाणून घेऊयात –

जीवन तरुण पॉलिसी ही एक नॉन-लिंक्ड, पार्टिसिपेटरी, इंडिविजुअल, जीवन विमा बचत योजना आहे. एलआयसीची ही योजना 0 ते 12 वयोगटातील मुलांसाठी आहे. यामध्ये शिक्षणापासून लग्नापर्यंत संबंधित सर्व खर्च भागविण्यासाठी तुम्ही योजनेत गुंतवणूक करू शकता.

जर तुम्ही तुमच्या मुलासाठी जीवन तरूण पॉलिसी घेणार असाल तर तुमच्या मुलाचे वय कमीत कमी 90 दिवस असावे. जास्तीत जास्त 12 वर्षे असावीत. या पॉलिसीसाठी मुलाचे वय 20 वर्षे पूर्ण होईपर्यंत प्रीमियम भरावा लागतो. मूल 25 वर्षांचे झाल्यानंतर तुम्हाला या पॉलिसीचा लाभ मिळेल. जीवन तरूण पॉलिसीमध्ये किमान 75,000 रुपयांपर्यंत विमा रक्कम मिळते. ही पॉलिसी केवळ मुलांच्या नावावर घेता येते आणि त्यातून मिळणारी रक्कम केवळ मुलालाच दिली जाते.

जोपर्यंत तुमचा मुलगा 20 वर्षाचा होत नाही तोपर्यंत तुम्हाला प्रीमियम भरावा लागेल. यामध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार तिमाही, सहामाही आणि वार्षिक प्रीमियम भरू शकता. जीवन तरुण पॉलिसीमध्ये दररोज 150 रुपये गुंतवल्यास वार्षिक प्रीमियम 54,000 रुपये होईल.

8 वर्ष गुंतवणूक केली तर 8 वर्षांची गुंतवणूक 4 लाख 32 हजार रुपये असेल. तसेच 2.47 लाख रुपयांचा बोनसही गुंतवू शकता. विमा संरक्षण 5 लाख रुपये असेल. यानंतर तुम्हाला 97,000 रुपयांचा रॉयल्टी बोनस मिळेल. अशा प्रकारे या पॉलिसीअंतर्गत तुम्हाला 8 लाख 44 हजार 550 रुपये मिळतील.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: LIC Policy

Recent Posts