LIC Jeevan Tarun Scheme : आजच्या या महागाईच्या काळात आर्थिक नियोजन करणे खूप कठीण झाले आहे. लोकांचे उत्पन्न योग्य असले तरी देखील मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च होतो. अशास्थितीत लोक आपल्या मुलाचे किंवा मुलीची शैक्षणिक स्वप्ने पूर्ण करू शकत नाहीत. त्यामुळे पालकांनी आधीच अशा योजनांमध्ये पैसे गुंतवणे पाहिजे, जे त्यांच्या मुलांचे भविष्य सुधारू शकतील. आज आपण एलआयसीच्या अशाच अप्रतिम स्कीमबद्दल बोलणार आहोत, ज्यामध्ये पैसे गुंतवणूक तुम्ही मोठा परतावा कमावू शकता.
भारतीय आयुर्विमा महामंडळ देशातील नागरिकांना अशा योजनेंतर्गत गुंतवणूक करण्याची संधी देत आहे, ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून तुमच्या मुलांचे भविष्य उज्वल करू शकता, एवढेच नाही तर त्यात गुंतवणूक केल्याने तुमच्या मुलांना उच्च शिक्षण देण्यासाठी देखील मदत मिळेल.
आम्ही आज भारतीय आयुर्विमा महामंडळाची जीवन तरुण योजनेबद्दल सांगणार आहोत. ज्यामध्ये पालकांना आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्याची उत्तम संधी मिळते. एलआयसीच्या या जीवन तरुण योजनेमध्ये लोक 90 दिवस ते 12 वर्षे वयोगटातील मुलांचा विमा काढू शकतात. हे लक्षात घेण्यासारखे आहे की LIC ची जीवन तरुण योजना म्हणजेच पॉलिसी 25 वर्षांमध्ये परिपक्व होते.
काय आहे LIC जीवन तरुण योजना ?
एलआयसीच्या या जीवन तरुण पॉलिसीमध्ये, तुम्ही किमान ७५,००० रुपयांची विमा रक्कम घेऊ शकता, जरी याच्या वर कोणतीही मर्यादा सेट केलेली नाही. लोक ही पॉलिसी फक्त मुलांच्या नावावर घेऊ शकतात, इथे या प्लॅनमध्ये मिळणारी रक्कम फक्त मुलाला दिली जाते.
पॉलिसी बाबत महत्वाच्या गोष्टी !
-जर कोणी या प्लॅनमध्ये दररोज 150 रुपये गुंतवले तर वार्षिक प्रीमियम 54000 रुपये असेल.
-यामुळे तुमच्या जमा केलेल्या पैशाची गुंतवणूक 8 वर्षांत 4,32000 रुपये होईल.
-येथे तुम्हाला कंपनीकडून 2,47,000 रुपयांचा बोनस मिळेल.
-या पॉलिसीची विमा रक्कम 5 लाख रुपये असेल.
-या गुंतवणुकीच्या कालावधीनंतर, तुम्हाला लॉयल्टी बोनस म्हणून 97,000 रुपये मिळतील.
-यामध्ये ग्राहकांना या पॉलिसी अंतर्गत 8,44,550 रुपये मिळतील.