LIC Policy : केंद्र आणि राज्य सरकार मुलींसाठी भारतीय सरकारी विमा कंपनी एलआयसीद्वारे राबवल्या जातात. अशीच एलआयसीने मुलींसाठी एक शानदार योजना आणली आहे. ज्यात तुम्ही गुंतवणूक करून घरबसल्या चांगला परतावा मिळवू शकतात.
एलआयसीच्या पॉलिसीचे नाव कन्यादान पॉलिसी असे आहे. ज्या पालकांचे उत्पन्न कमी आहे, त्यांच्यासाठी मुलींच्या लग्नासाठी पैशाची बचत करण्याचे या एलआयसीच्या योजनेचे एकमेव आणि महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. या योजनेत तुम्हाला 3600 रुपयांच्या गुंतवणुकीवर 26 लाख मिळतील.
LIC च्या या स्कीममध्ये तुम्ही 22 वर्षांसाठी प्रीमियम भरला तर 25 वर्षांनंतर स्कीम मॅच्युअर होईल. तुम्हाला परताव्यावेळी 26 लाख रुपयांची रक्कम मिळेल. म्हणजेच, समजा तुम्ही या योजनेत वेळेत गुंतवणूक करायला सुरुवात केल्यास तुम्ही तुमच्या मुलीच्या भविष्याच्या सर्व चिंतांपासून मुक्त व्हाल.
जाणून घ्या संपूर्ण पॉलिसी
गुंतवणूक करण्यापूर्वी हे लक्षात घ्या की या पॉलिसीची मुदत 13-25 वर्षे इतकी आहे. पॉलिसी घेण्यासाठी तुमच्या मुलीचे वय 1 वर्ष ते 10 वर्षे आणि वडिलांचे वय कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 50 वर्षे असावे. तर परिपक्वतेचे जास्तीत जास्त वय 65 वर्षे इतके आहे. एलआयसीच्या पॉलिसीमध्ये तुमहाला प्रीमियम मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक भरता येतो.
प्रीमियमची रक्कम
असा आहे परिपक्वता लाभ
पॉलिसीच्या परिपक्वता लाभाबद्दल बोलायचे झाले तर पॉलिसी धारक जिवंत असेल तर विमा रकमेसह सिंपल रिव्हिजनरी बोनसचा लाभ मिळतो. तसेच त्यांना अतिरिक्त बोनसचाही लाभ मिळेल.
इतकेच नाही तर जर तुम्ही ही पॉलिसी खरेदी केली तर तीन वर्षांनी तुम्हाला कर्जाचा लाभ मिळेल. तुम्ही प्रीमियम जमा केल्यावर 80C अंतर्गत वजावट उपलब्ध आहे. कलम 10D अंतर्गत परिपक्वता रक्कम करमुक्त असून या पॉलिसीसाठी विमा रकमेची मर्यादा कमीत कमी 1 लाख रुपयांपासून सुरू होते आणि कमाल मर्यादा नाही.
मिळेल मृत्यू लाभ
समजा तुम्ही ही पॉलिसी घेतल्यानंतर काही काळानंतर वडिलांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला ही पॉलिसी भरण्याची गरज पडत नाही. कारण त्यांचा प्रीमियम माफ केला जातो आणि पॉलिसी विनामूल्य चालू राहते.
हे लक्षात घ्या की मुदतपूर्तीच्या वेळी, संपूर्ण रक्कम नॉमिनीला देण्यात येते. पॉलिसीच्या उर्वरित वर्षांमध्ये मुलीला प्रत्येक वर्षी विमा रकमेच्या 10% रक्कम मिळते. तसेच लाभार्थीचा अपघाती मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबाला 10 लाख रुपये आणि नैसर्गिक मृत्यू झाला तर 5 लाख रुपये मिळतात.