LIC Policy : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्वीमा महामंडळ म्हणजेच LIC ही बचत योजना सुरक्षा आणि परताव्यासाठी खूप लोकप्रिय आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे एलआयसीमध्ये सर्व वयोगटातील लोकांसाठी पॉलिसी उपलब्ध आहेत.
आता यामध्ये तुम्हीदेखील छोटी गुंतवणूक करून मोठा निधी जमा करू शकता. एलआयसीची अशीच एक योजना आहे, जिचे नाव आहे एलआयसी जीवन लाभ पॉलिसी. यामध्ये तुम्ही प्रत्येक महिन्याच्या छोट्याशा गुंतवणुकीतून 54 लाखांची रक्कम जमा करू शकता. कसे ते जाणून घ्या.
दररोज वाचावा 7,572 रुपये
एलआयसीच्या या शानदार योजनेमध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याला फक्त 7,572 रुपये वाचवावे लागणार आहेत. असे केले तर तुम्ही तुमच्या आगामी काळासाठी 54 लाख रुपयांचा निधी जमा करू शकता. एलआयसीची ही एक प्रीमियम आणि नॉन लिंक्ड योजना असून ही या योजनेमुळे गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर कुटुंबाला आर्थिक मदत करते. समजा गुंतवणूकदार मॅच्युरिटीपर्यंत टिकून राहिला तर त्याला मोठा निधी मिळतो. हे लक्षात घ्या की या योजनेमध्ये गुंतवणूकदारांना त्याच्या इच्छेनुसार प्रीमियम निवडता येतो.
मिळतील मॅच्युरिटीवर 54 लाख रुपये
जर तुम्हाला ही योजना घ्यायची असेल तुमचे वय कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 59 वर्षे असावे. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या 25 व्या वर्षी LIC ची योजना घेतली तर त्याला प्रत्येक महिन्याला 7,572 रुपये किंवा दर दिवशी 252 रुपये गुंतवावे लागणार आहेत. त्यामुळे एकूण वर्षभरात तुमच्याकडे 90,867 रुपये जमा होतील. त्यानुसार 25 वर्षात एकूण 20 लाख रुपये जमा होतील.
मिळतील 54 लाख रुपये
या योजनेमध्ये, गुंतवणूकदाराला एकूण 54 लाख रुपये मिळतील. जर तुम्ही या योजनेमध्ये आयुष्य लाभासाठी गुंतवणूक केली तर LIC तुम्हाला अंतिम अतिरिक्त बोनस आणि मुदतपूर्तीवर रिव्हर्शनरी बोनसचा लाभ देईल.
जाणून घ्या फायदे
सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेमध्ये 8 ते 59 वर्षे वयोगटातील सर्व नागरिकांना गुंतवणूक करता येते. तर गुंतवणूकदार 10 वर्षे, 13 वर्षे आणि 16 वर्षे गुंतवणूक करू शकतात. ज्यांचे पैसे 16 ते 25 वर्षांच्या मॅच्युरिटीवर उपलब्ध असतात. तर 59 वर्षांची एक व्यक्ती 16 वर्षांसाठी पॉलिसी घेऊ शकते.
हे लक्षात घ्या की पॉलिसी घेण्यासाठी तुमचे वय 75 वर्षांपेक्षा जास्त नसावे. तसेच जर गुंतवणूकदाराचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाला तर त्याचे सर्व फायदे नॉमिनीला मिळतात. विमा कंपनी बोनससह नॉमिनीला विम्याचा लाभ देत असून याशिवाय मृत्यू लाभही देण्यात येतो.