आर्थिक

LIC Scheme: तुमच्या मुलीसाठी एलआयसीच्या ‘या’ पॉलिसीमध्ये दररोज 121 रुपये जमा करा आणि 27 लाख मिळवा; वाचा योजनेची माहिती

LIC Scheme:- गुंतवणुकीसाठी जेवढे पर्याय उपलब्ध आहेत त्यामध्ये गुंतवणूकदारांकडून प्रामुख्याने बँकांच्या मुदत ठेव योजना, सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या अल्पबचत योजना आणि पोस्ट ऑफिसच्या अनेक योजनांना प्रामुख्याने प्राधान्य दिले जाते. तसेच यासोबत भारतीय आयुर्विमा  महामंडळ अर्थात एलआयसीच्या अनेक योजनांमध्ये देखील गुंतवणूक केली जाते. जर आपण एलआयसीच्या योजनांच्या दृष्टिकोनातून पाहिले तर एलआयसी ने अनेक आकर्षक अशा योजना लॉन्च केलेल्या आहेत व यात गुंतवणूक केल्यावर गुंतवणूक सुरक्षित राहतेच परंतु परतावा देखील चांगला मिळतो.

अशाच प्रकारे जर आपण एलआयसीची खास मुलींसाठी असलेली एक पॉलिसी पाहिली तर त्यामध्ये जर गुंतवणूक करायला सुरुवात केली तर मुलींना 25 वर्षानंतर प्रचंड प्रमाणात पैसा मिळतो. या योजनेमध्ये जर तुम्ही गुंतवणूक करायला सुरुवात केली तर तुम्हाला तुमच्या मुलीचे शिक्षण आणि लग्नाची चिंता अजिबात करावी लागणार नाही. याच महत्वपूर्ण योजनेची माहिती या लेखात आपण घेऊ.

 एलआयसीची कन्यादान योजना आहे मुलींसाठी महत्त्वाची

एलआयसीच्या या योजनेचे नाव आहे कन्यादान पॉलिसी किंवा कन्यादान योजना होय. या योजनेमध्ये तुम्हाला तेरा वर्षे किंवा पंचवीस वर्षापर्यंत सातत्याने पैसे जमा करावे लागतात व एवढेच नाही तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार दररोज या पॉलिसीमध्ये पैसा जमा करू शकतात.

उदाहरण घ्यायचे झाले तर तुम्ही या योजनेमध्ये दररोज 121 रुपये जमा करायला सुरुवात केली तर पंचवीस वर्षानंतर तुम्हाला सत्तावीस लाख रुपये मिळतात. या योजनेमध्ये जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल म्हणजेच पैसा जमा करायचे असतील तर तुम्हाला त्यासाठी अर्ज करावा लागतो व तुम्ही तुमच्या सोयीनुसार गुंतवणुकीची रक्कम वाढवू शकतात किंवा कमी देखील करू शकतात.

 या योजनेतील गुंतवणुकीवर मिळतो करमाफीचा लाभ

एलआयसीच्या कन्यादान पॉलिसीमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर तुम्हाला दीड लाख रुपयांची कर सुट दिली जाते. तसेच तुम्ही एलआयसीच्या कन्यादान पॉलिसीमध्ये जर पैसे गुंतवले तर यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा कर द्यावा लागत नाही.

 कसे आहे या योजनेचे कॅल्क्युलेशन आणि परिपक्वता कालावधी?

तुम्हाला जर एलआयसीच्या कन्यादान पॉलिसीमध्ये पैसे जमा करायचे असतील तर त्याकरिता तुम्हाला तेरा वर्ष किंवा पंचवीस वर्षांपर्यंत गुंतवणूक करणे गरजेचे आहे. यामध्ये तुम्हाला प्रीमियम भरावा लागतो व यात तुम्ही दोन प्रकारचा प्रीमियम प्लान निवडू शकतात.

यातील पहिला म्हणजे तुम्ही दररोज 121 रुपये या पॉलिसीमध्ये जमा करू शकतात किंवा 3650 रुपये प्रत्येक महिन्याला जमा करू शकता. इतकी रक्कम गुंतवल्यावर तुम्हाला पंचवीस वर्षानंतर सत्तावीस लाख रुपयांची रक्कम मिळेल. तसेच तुम्ही दररोज 75 रुपये किंवा दरमहा 2250 ची गुंतवणूक केली तरी तुम्हाला 14 लाख रुपये पर्यंत परतावा मिळतो.

यामध्ये तुम्ही गुंतवणूक कमी केली तर कमी पैसा मिळतो व गुंतवणूक वाढवली तर जास्त पैसा मिळतो. याशिवाय गुंतवणूकदाराचा जर अपघाती मृत्यू झाला तर गुंतवणूकदाराच्या कुटुंबाला दहा लाख रुपये मिळतात. कोणत्याही वडिलांना स्वतःच्या मुलीच्या नावाने ही पॉलिसी खरेदी करता येऊ शकते. या पॉलिसीमध्ये मुलीच्या वडिलांना दरवर्षी बोनसचा फायदा देखील मिळतो.

 या पॉलिसीत अर्ज किंवा खाते उघडण्यासाठी लागणारी कागदपत्रे

या पॉलिसीमध्ये खाते किंवा अर्ज करण्यासाठी मुलीचे आधार कार्ड व मुलीच्या जन्माचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, पत्त्याचा पुरावा, जात प्रमाणपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड, मोबाईल नंबर, पासपोर्ट आकाराचा फोटो व मुलीचे बँक खाते पासबुक इत्यादी कागदपत्रे लागतात.

महत्वाचे म्हणजे कन्यादान पॉलिसीसाठी तुम्हाला अर्ज करण्याकरिता जवळच्या एलआयसी कार्यालयामध्ये जावे लागते व त्या ठिकाणी या पॉलिसी करिता आवश्यक असलेला अर्ज घेऊन तो भरावा लागतो. नंतर आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज करताना एक निश्चित रक्कम तुम्हाला जमा करावी लागते. नंतर हा अर्ज एलआयसी ऑफिसमध्ये सबमिट करावा लागतो.

 

Ajay Patil

Published by
Ajay Patil
Tags: LIC scheme

Recent Posts