LIC Scheme : आजकाल अनेकांना गुंतवणूक करायची आहे मात्र गुंतवणुकीचे मार्ग अनेकांना माहिती नाहीत. त्यामुळे गुंतणूक करताना अनेकजण कमी परतावा मिळणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. मात्र तुम्ही एलआयसीच्या अशा एका योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता जिथे तुम्हाला आयुष्यभर नफा मिळत राहील.
गुंतवणूक करून त्या गुंतवणुकीमधून चांगला नफा मिळवणे हाच सर्वांच्या गुंतवणुकीमागचा उद्देश असतो. मात्र अनेकदा गुंतवणूक केल्यांनतर काही जणांची फसवणूक देखील होते त्यामुळे तुम्ही सरकारच्या एलआयसीच्या अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. तसेच या योजनांमध्ये गुंतवणुकीचे पैसे बुडण्याची कोणतीही भीती नाही.
एलआयसीच्या जीवन सरल पॉलिसी योजनेमध्ये तुम्ही एकदा गुंतवणूक करून बंपर परतावा मिळवू शकता. ही एक एंडोमेंट योजना आहे. तसेच या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही कर्ज देखील घेऊ शकता. संपूर्ण मुदतीदरम्यान मृत्यूच्या वेळीही ही योजना आर्थिक संरक्षण प्रदान करते.
तुम्हालाही या एलआयसीच्या जीवन सरल पॉलिसी योजनेमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार या योजनेचे प्रीमियम भरू शकता. तुम्ही प्रीमियम वार्षिक, सहामाही, त्रैमासिक किंवा दर महिन्याला प्रीमियम भरण्याचा पर्याय निवडू शकता. तसेच तुम्ही संपूर्ण रक्कम एकदाच गुंतवणूक करू शकता.
या योजनेचा फायदा गुंतवणूकदार किंवा पेन्शनधारक जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत पेन्शन मिळेल. जर गुंतवणूकदारांचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदाराला गुंतवणुकीचा बेस प्रीमियम मिळेल.
एलआयसी जीवन सरल पॉलिसीचे फायदे
अतिरिक्त रायडर्स
प्रीमियम
निष्ठा लाभ
अपघाती मृत्यू आणि अपंगत्व
बेनिफिट रायडर
परिपक्वता फायदे
विशेष आत्मसमर्पण
दरमहा 12 हजार कसे मिळणार?
एलआयसीच्या सरल पेन्शन योजनेअंतर्गत तुम्हालाही दरमहा 12 हजार रुपयांची पेन्शन मिळवायची असेल तर तुम्हाला या योजनेत एकदाच प्रीमियम भरावा लागेल. त्यांनतर तुम्हाला व्हायच्या 60 व्या वर्षीनानंतर 12000 रुपये मासिक पेन्शन मिळेल.
तुम्हाला या योजनेतून दरमहा पेन्शन हवी असेल तर वयाच्या 60 व्या वर्षी एलआयसीच्या सरल पेन्शन योजनेमध्ये 10 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. जर तुम्ही 10 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास तुम्हाला 58950 रुपये वार्षिक पेन्शन मिळेल.