आर्थिक

LIC Scheme : काय सांगता ! फक्त 150 रुपयांत मुलांचे भविष्य होणार सुरक्षित ; ‘या’ योजनेमध्ये आजच करा गुंतवणूक, फायदे जाणून व्हाल थक्क

LIC Scheme : देशात आज असे अनेकजण जे आपल्या आणि कुटुंबाच्या भविष्याचा विचार करून लहान लहान बचत योजनांमध्ये मोठी गुंतवणूक करत आहे. या बचतीचा त्यांना मोठ्या प्रमाणात फायदा देखील होताना सध्या दिसत आहे. तर दुसरीकडे आता तुम्ही देखील आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करून बचत करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही एका खास योजना आणली आहे.

या योजनेचा फायदा घेऊन तुम्ही दररोज फक्त 150 रुपयांची बचत करून तुमच्या मुलांच्या भविष्य सुशोभित करण्यासाठी मोठी रक्कम जमा करू शकतात. चला मग जाणून घेऊया तुम्ही कोणत्या योजनेमुळे तुमच्या मुलांचे भविष्य सुरक्षित करू शकतात.

आम्ही येथे तुम्हाला LIC च्या जीवन तरुण पॉलिसी योजनेबद्दल माहिती देत आहोत ज्याचा फायदा घेऊन तुम्ही कमी वेळेत तुमच्या मुलांचे अनेक स्वप्न पूर्ण करू शकतात. एलआयसीच्या या पॉलिसी अंतर्गत, तुम्ही दररोज केवळ 150 रुपयांची बचत करून वर्षभरात 54000 रुपये वाचवू शकता. ही रक्कम एलआयसीच्या जीवन तरुण पॉलिसीसाठी प्रीमियम म्हणून जमा केली जाऊ शकते.

मुलाचे वय काय असावे, किती दिवसात गुंतवणूक केली जाते

या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमचे मूल कमीत कमी तीन महिने आणि जास्तीत जास्त 12 वर्षांचे असणे आवश्यक आहे. तथापि, मुलाचे वय 20 वर्षे होईपर्यंत पॉलिसीमध्ये प्रीमियम भरले जातात. याशिवाय, मुलाचे वय 25 झाल्यानंतर त्याला पॉलिसीचे सर्व फायदे मिळतात.

विम्याची रक्कम किती असावी

LIC च्या जीवन तरुण पॉलिसी अंतर्गत, किमान विमा रक्कम 75 हजार रुपये असावी. कमाल मर्यादा नाही. 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलासाठी, पॉलिसीची मुदत 13 वर्षे आहे. त्याची किमान विमा रक्कम 5 लाख रुपये असावी.

गुंतवणुकीची एकूण रक्कम किती असेल

एका वर्षात 54000 च्या प्रीमियमनंतर, आठ वर्षांनंतर 4,32,000 गुंतवणुकीवर एकूण 8,44,500 रुपये परतावा मिळतो. एकूण रकमेत 2,47000 बोनस आणि 97,000 लॉयल्टी बोनस ऑफर केले जातात.

प्रीमियम कसा भरायचा

प्रीमियम मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर भरला जाऊ शकतो.

हे पण वाचा :- Business Idea: होळीपूर्वी सुरु करा ‘हे’ काम ! होणार लाखोंची कमाई ; जाणून घ्या कसा होणार फायदा

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts