Loan EMI : अनेकांना एकाच वेळी लाखो रुपये जमवणे शक्य नसते. त्यामुळे अनेकजण कर्ज घेत असतात. कर्ज घेतल्यानंतर त्याची परतफेड करणे तितकेच महत्त्वाचे आहे. अशातच जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही घेतलेल्या कर्जाची वेळेवर परतफेड करू शकत नाही, तर काळजी करू नका.
कारण तुम्ही आता त्यासाठी काही पावले तुम्ही सुरुवातीलाच उचलू शकता. जर तुम्ही कर्ज भरण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमचे कर्ज एका झटक्यात पूर्ण होऊ शकते. त्यासाठी तुम्हाला काही टिप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.
व्याजदराची तुलना –
समजा जर तुम्हाला तुमची ईएमआय पेमेंट रक्कम कमी करायची असल्यास सर्वात अगोदर तुम्ही वेगवेगळ्या बँका आणि वित्तीय संस्थांचे व्याजदर शोधून काढणे खूप गरजेचे आहे. असे होऊ शकते की तुमची नियमित बँक खूप जास्त शुल्क आकारेल. तुम्ही तुमच्यापेक्षा जास्त व्याजदर घेत आहात आणि त्या ठिकाणी दुसरी बँक तुम्हाला कमी व्याजदराने कर्ज देऊ शकते.
दीर्घ परतफेडीचा कालावधी –
यात तुमची एकूण कर्जाची किंमत जास्त असण्याची शक्यता आहे, मात्र दीर्घ कालावधीमुळे, तुमच्यावर EMI भार कमी होऊन तुम्हाला तो भरण्यात जास्त त्रास देखील होणार नाही.
क्रेडिट स्कोअर-
समजा तुम्हाला बँकांकडून स्वस्त कर्ज मिळवायचे असल्यास तुम्हाला चांगला क्रेडिट स्कोर बनवावा लागणार आहे. ज्यामुळे बँकांचा तुमच्यावर विश्वास बसू शकेल. हे लक्षात घ्या की 750 च्या वर चांगला क्रेडिट स्कोअर मानला जातो. त्यामुळे बँकांना असे वाटत असते की तुमच्याकडून तुमची मागील थकबाकी वेळेवर भरली जात आहे. त्यामुळे संबंधित बँक तुमच्यावर विश्वास ठेवू शकते तसेच तुम्हाला स्वस्त दरात कर्ज मिळूही शकते.
जुन्या कर्जाची परतफेड –
म्हणजेच तुम्ही कर्जदाराकडून नवीन कर्ज घेऊन जुन्या कर्जाची परतफेड करावी. मात्र तुम्ही हे तेव्हाच करावे जेव्हा तुम्हाला 50 ते 100 बेसिस पॉइंट्स म्हणजेच दोन्ही कर्जांमध्ये 0.5 ते 1 टक्के नफा मिळत आहे.
प्रीपेमेंट-
समजा जर तुमच्याकडे जास्त पैसे असल्यास तुम्ही त्याद्वारे तुमचे कर्ज प्रीपेमेंट करू शकता, तुम्ही प्रत्येक वर्षी तुमच्या कर्जाच्या 5% प्रीपेमेंट करू शकता, तर तुमचे 20 वर्षांचे कर्ज केवळ 12 वर्षांत पूर्ण होईल.