Loan Information:- जीवनामध्ये प्रत्येकाला पैशांची गरज भासते. अनेकदा आरोग्य विषय किंवा इतर आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते व हातात पैसा नसतो. अशाप्रसंगी माणसाची खूप मोठ्या प्रमाणावर धांदल उडते व आर्थिक समस्या निर्माण होते. त्यामुळे बरेच जण अशावेळी मित्र किंवा नातेवाईक यांचा आधार घेतात.
परंतु त्यांच्याकडे देखील वेळेत पैसा उपलब्ध असेल असे होत नाही. तसेच तुम्हाला बँकांच्या माध्यमातून वैयक्तिक कर्ज वगैरे घ्यायचे असेल तर त्याची देखील एक प्रोसेस असल्यामुळे तुम्हाला हवा तेव्हा पैसा बँकांकडून देखील मिळणे जवळजवळ अशक्य होते. त्यामुळे या अनुषंगाने जर आपण विचार केला तर रिझर्व बँकेचे मान्यता असलेल्या नॉन बँकिंग फायनान्स कंपनी म्हणजेच एनबीएफसी कठीण प्रसंगी तुमच्या मदतीसाठी धावू शकतात.
अशा एनबीएफसी चे अनेक मोबाईल ॲप्लिकेशन असून त्या माध्यमातून तुम्ही कमीत कमी शुल्काने कमीत कमी कागदपत्र किंवा कुठल्याही कागदपत्र शिवाय कर्ज मिळू शकतात. असेच एक महत्त्वाचे मोबाईल ॲप्लिकेशन पाहिले तर त्यामध्ये मनी व्ह्यू हे ॲप तुम्हाला खूप फायद्याचे ठरू शकते. हे एक ऑनलाईन कर्ज प्लॅटफॉर्म असून कुठल्याही प्रकारचे प्रक्रिया शुल्क न आकारता तुम्हाला या माध्यमातून कर्ज मिळू शकते व ते देखील ताबडतोब.
या एप्लीकेशन वरून मिळते पाच हजार ते वीस लाखांपर्यंतचे कर्ज
मनी व्ह्यू लोन ॲपच्या माध्यमातून तुम्ही 5000 ते 20 लाख पर्यंतचे कर्ज घेऊ शकतात. तसेच तुम्हाला याकरिता जास्तीत जास्त सिबिल स्कोरची देखील आवश्यकता नाही. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या गरजेनुसार कर्ज घेऊ शकतात. तुम्ही या ऑनलाइन प्लॅटफॉर्म किंवा एप्लीकेशनचे स्टार रेटिंग पाहिले तर ते खूप भक्कम असून आतापर्यंत सुमारे 20 लाख लोकांनी कर्ज घेतलेले आहे व यावरून कर्ज घेण्याची प्रक्रिया देखील खूप सोपी आहे.
तसेच या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ग्राहकांचा डेटा व्यवस्थापित करण्याकरिता 256 बीट डेटा एन्क्रिप्शन चा वापर केला जातो त्यामुळे ग्राहकांचा डेटा सुरक्षित राहतो. तसेच तुमचे वैयक्तिक माहिती आणि ओटीपी इत्यादी देखील खूप सुरक्षित ठेवले जाते. या माध्यमातून तुम्हाला कर्ज घ्यायचं असेल तर तुम्हाला गुगल प्ले स्टोअर वरून मनी व्ह्यू हे ॲप डाऊनलोड करणे गरजेचे आहे.
यामध्ये तुम्हाला काही छोट्याशा प्रमाणात अर्ज भरावा लागतो व यामध्ये तुम्हाला तुमचा वैयक्तिक माहिती तसेच पॅन कार्ड वगैरे इत्यादी विषयी तपशील भरावा लागतो. जर तुम्ही पात्र असाल तर मिनिटांमध्ये तुमच्या खात्यावर कर्जाची रक्कम क्रेडिट केली जाते किंवा मनी व्ह्यूच्या माध्यमातून तुम्हाला कॉल देखील येतो.
तुम्ही या अर्जावर तुमची माहिती भरता त्यानंतर तुम्ही नेक्स्ट पेजवर तुम्हाला किती कर्ज हवे आहे याची माहिती देखील तुम्हाला द्यावी लागते. तसेच महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला कर्जाची आवश्यकता का आहे हे देखील तुम्हाला नमूद करणे गरजेचे असते. यामध्ये तुम्हाला एज्युकेशन किंवा हेल्थ किंवा वैयक्तिक कर्ज किंवा होम रिनोवेशन इत्यादी मधून नेमके कशासाठी कर्ज हवे आहे हे देखील तुम्हाला निवडावे लागते. मिनिटाची ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर झटक्यात तुम्हाला या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध होते. अशा पद्धतीने तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने या माध्यमातून कर्ज घेऊ शकतात.