आर्थिक

कर बचतीकरिता गुंतवणूक पर्याय शोधत आहात? ‘या’ ठिकाणी कराल गुंतवणूक तर होईल लाखोंची बचत

Tax Saving Tips:- गुंतवणुकीचे नियोजन करताना किंवा गुंतवणूक पर्याय निवडताना प्रत्येक गुंतवणूकदार ज्याप्रमाणे गुंतवणुकीचे सुरक्षितता आणि त्यातून मिळणारा परतावा या दोन गोष्टींचा विचार करतो अगदी त्याचप्रमाणे गुंतवणूक पर्यायामध्ये गुंतवणूक करत आहोत त्या ठिकाणी आपल्याला कर बचतीचा लाभ मिळू शकतो का? या दृष्टिकोनातून देखील विचार केला जातो.

त्यामुळे प्रत्येक गुंतवणूकदार हा आर्थिक वर्ष संपण्याच्या आधी कर बचतीची नियोजन करत असतो व त्यासाठी गुंतवणूक कोणत्या ठिकाणी करावी किंवा कोणते गुंतवणूक पर्याय निवडावेत? याची चाचपणी करताना आपल्याला दिसून येतो.आता जर आपण आर्थिक वर्ष 2024-25 चा विचार केला तर ते संपायला तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक असून

त्यामुळे कर बचतीचे नियोजन करणे गरजेचे आहे व त्यामुळे तुम्ही अजून पर्यंत देखील याचे नियोजन केले नसेल तर तुम्ही लवकरात लवकर नियोजन करणे गरजेचे आहे.त्यामुळे तुम्हाला जर तुमचे पैसे सुरक्षीत असलेल्या ठिकाणी गुंतवायचे असतील व कर देखील वाचवायचा असेल तर या लेखात आपण गुंतवणूक योजनांची थोडक्यात माहिती बघू.

कर बचतीसाठी असलेले उत्तम गुंतवणूक पर्याय

1- एनएससी अर्थात नॅशनल सेविंग सर्टिफिकेट योजना- आर्थिक वर्ष संपण्याच्या आधी तुम्हाला जर कर बचतीचे नियोजन करायचे असेल व तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक करून कर देखील वाचायचा असेल तर पोस्ट ऑफिसची नॅशनल सेविंग सर्टिफिकेट योजना म्हणजेच एनएससी स्कीम ही अतिशय फायद्याची अशी योजना आहे.

या योजनेमध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला वार्षिक 7.70% व्याज दिले जाते. या योजनेत तुम्हाला पाच वर्षांकरिता गुंतवणूक करावी लागते. या योजनेत जर तुम्ही पाच वर्षाकरिता गुंतवणूक केली तर तुम्हाला कर सूट मिळते. त्यामुळे पोस्ट ऑफिस नॅशनल सेविंग सर्टिफिकेट स्कीमचा गुंतवणुकीसाठी तुम्ही विचार करू शकतात.

2- पोस्ट ऑफिस राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना अर्थात एनएससी स्कीम- पोस्ट ऑफिसची नॅशनल सेविंग सर्टिफिकेट योजना ही एक महत्त्वाची गुंतवणूक योजना आहे व या योजनेत जर गुंतवणूक केली तर त्यावर 7.7% वार्षिक व्याज दिले जात आहे व यावर मिळणारे व्याज वार्षिक आधारावर कॅल्क्युलेट केले जाते व गुंतवणुकीचा कालावधी संपल्यानंतर व्याजाची रक्कम तुम्हाला मिळत असते.

या योजनेमध्ये जर तुम्हाला खाते उघडायचे असेल तर किमान एक हजार रुपयांची गुंतवणूक तुम्हाला करावी लागते व तुम्ही या योजनेत अल्पवयीन व्यक्तीच्या नावाने देखील खाते उघडू शकतात व तीन प्रौढ एकत्र येऊन जॉईंट अकाउंट देखील उघडू शकतात.

या योजनेमध्ये पाच वर्षे गुंतवणूक करावी लागते व हा मॅच्युरिटी पिरेड संपण्या अगोदर तुम्ही योजनेतून बाहेर पडू शकत नाही. या योजनेमध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुमच्या जमा रकमेवर आयकर कलम 80C अंतर्गत कर सुट दिली जाते. या योजनेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कमाल गुंतवणुकीला कुठलीही मर्यादा नाही.

पाच वर्षाच्या एफडीवर किती मिळतो कर सवलतीचा लाभ?
करबचत एफडी पाच वर्षांमध्ये परिपक्व होते व यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत एकूण उत्पन्नातून दीड लाख रुपयांकरिता कर कपातीचा दावा करू शकतात. म्हणजेच तुम्ही या योजनेच्या माध्यमातून दीड लाख रुपये तुमच्या करपात्र उत्पन्नातून कमी करू शकतात.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts