LPG Cylinder : तेल कंपन्यांनी (oil companies) एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी वाढ केली आहे. ६ जुलैच्या सकाळपासून कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडर (Domestic gas cylinder) 50 रुपयांनी महाग केले आहेत.
यासोबतच दिल्लीत (Delhi) गॅस सिलिंडरची किंमत 1053 रुपयांवर पोहोचली आहे. याशिवाय घरगुती गॅस सिलिंडरची किंमत कोलकात्यात 1079 रुपये, मुंबईत (Mumbai) 1052.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 1068.50 रुपये झाली आहे.
दुसरीकडे, व्यावसायिक सिलिंडरच्या (commercial cylinders) दरात पुन्हा एकदा कपात करण्यात आली आहे. याआधीही 1 जुलै रोजी तेल कंपन्यांनी व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत (LPG Commercial Cylinder Price) 198 रुपयांची मोठी कपात केली होती.
त्यानंतर आगामी काळात घरगुती गॅस सिलिंडरही स्वस्त होईल, अशी अपेक्षा होती. मात्र आता कंपन्यांनी किंमत वाढवून सर्वसामान्यांना धक्का दिला आहे.
1 जुलै रोजी दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडर २०२१ रुपयांपर्यंत कमी करण्यात आला. आता ६ जुलै रोजी किमतीत आणखी कपात केल्यानंतर ती 2012.50 रुपये झाली आहे.
त्याचप्रमाणे कोलकातामध्ये १९ किलोचे व्यावसायिक गॅस सिलिंडर 2,132 रुपयांना मिळणार आहे. तो मुंबईत 1972.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 2177.50 रुपयांवर पोहोचला आहे. यापूर्वी १९ मे रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल करण्यात आला होता.
सिलिंडर 300 रुपयांपेक्षा स्वस्त
1 जुलैपूर्वी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत १ जून रोजी 135 रुपयांनी कपात करण्यात आली होती. अशाप्रकारे गेल्या 35 दिवसांत व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 300 रुपयांहून अधिक कपात झाली आहे. (मे महिन्यात सिलिंडरचे दर 2354 रुपये झाले होते.
२०० रुपये प्रति सिलेंडर सबसिडी
जनतेला महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत प्रति सिलिंडर 200 रुपये सबसिडी जाहीर केली होती. ही सबसिडी वर्षाला फक्त 12 सिलिंडरपर्यंत उपलब्ध असेल. सरकारच्या या निर्णयाचा ९ कोटींहून अधिक ग्राहकांना फायदा झाला आहे.