आर्थिक

Maharashtra Budget 2022 : सर्वांच्या तोंडाला काळं फासण्याचे काम; फडणवीसांचा अर्थसंकल्पावर जोरदार हल्लाबोल

मुंबई : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Budget Session 2022-23) या वित्तीय वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी अजित पवारांनी कोट्यवधी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे.

मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnaivis) यांनी या अर्थसंकल्पावर आक्षेप घेतला आहे. व त्यांनी यावरून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) वर जोरदार हल्लाबोल केला आहे.

यावेळी फडणवीस म्हणाले, कळसूत्री सरकारने विकासाचे पंचसूत्री मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या पंचसूत्रीने काही होणार नाही. याने महाराष्ट्रच्या (Maharashatra) विकासाला पंचतत्वात विलीन केले आहे.

तसेच सर्वांच्या तोंडाला काळं फासण्याचे काम या सरकारने केले आहे. हे बजेट विकासाला चालना देऊ शकत नाही. या बजेटमध्ये काही नाही. चालू कामांच्या घोषणा या बजेटमध्ये केल्या, असा आरोप फडणवीसांनी ठाकरे सरकारवर केला आहे.

पुढे ते म्हणाले, मला एका गोष्टीचा आनंद आहे, पहिल्या वर्षात आमच्या योजना बंद करणारे सरकार आता पुन्हा त्या योजना सुरू करत आहे. समृद्धी महामार्गपासून मेट्रोपासून बुलेट ट्रेनला विरोध केला आणि आता पुन्ह घोषणा करत आहे.

त्यामुळे हसावे की रडावे ते कळेना. कारण शेतकऱ्यांसाठी दोन वर्षापूर्वीच घोषणा आज पुन्हा केली. गेल्या दोन वर्षात शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही. कर्जखाती सांगितली नाहीत. शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही.

नुकसानाीची मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही. विम्याचे पैसेही मिळाले नाहीत. कोरोनात सर्वात जास्त मृत्यू झालेले राज्य का पाट थोपटून घेतंय. असा सवाल विचारत त्यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे.

Renuka Pawar

Recent Posts