Post Office RD : सामान्यतः लोकांचा असा समज आहे की, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातूनच मोठा फंड तयार करता येतो. पण तुम्ही योग्य गुंतवणूक योजना निवडली तर तुम्ही बँक किंवा पोस्ट ऑफिसमधूही चांगला निधी जमा करू शकता. होय, बँक किंवा पोस्ट ऑफिसच्या आरडीद्वारे मोठा निधी तयार केला जाऊ शकतो. हा मोठा निधी एक कोटी रुपयांपर्यंत असू शकतो. कसे ते जाणून घेऊया.
पोस्ट ऑफिसमधील आरडी 5 वर्षांसाठी आहे. पण 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही 5-5 वर्षे करून ही RD कितीही वेळा वाढवू शकता. या पर्यायाचा योग्य वापर केल्यास एक कोटी रुपयांचा निधी तुम्ही सहज तयार कराल.
पोस्ट ऑफिस आरडी ही भारत सरकारची ठेव योजना आहे. येथे निश्चित व्याज मिळण्यासोबतच, भारत सरकार जमा केलेल्या पैशाच्या सुरक्षिततेची आणि त्याच्या व्याजाची हमी देते. सध्या पोस्ट ऑफिस आरडीचा व्याजदर 6.5 टक्के आहे. जर तुम्हाला पोस्ट ऑफिस आरडीमधून 1 कोटी रुपयांचा निधी तयार करायचा असेल, तर तुम्हाला महिन्याला 10,000 रुपयांची आरडी सुरू करावा लागेल. 10,000 रुपयांची आरडी तुम्हाला भविष्यात करोडपती कसे बनवेल ते जाणून घेऊया.
5 वर्षांसाठी 10,000 रुपयांची आरडी सुरू केल्यानंतर, त्यात 7.10 लाख रुपये तयार होतील. यामध्ये तुमची जमा रक्कम ६ लाख रुपये असेल, तर सुमारे 1.10 लाख रुपये व्याज म्हणून मिळतील. 5 वर्षे पूर्ण होताच, ही आरडी आणखी 5 वर्षे वाढवा आणि दरमहा 10,000 रुपये जमा करत रहा.
अशा परिस्थितीत या आरडीमध्ये 10 वर्षांत 1,689,880 रुपयांचा निधी तयार होईल. यापैकी तुमची ठेव रक्कम 12 लाख रुपये असेल आणि तुम्हाला 4,89,880 रुपये व्याज मिळतील.
आता हा आरडी पुन्हा 5 वर्षांसाठी वाढवा. अशा प्रकारे 15 वर्षांत 3,042,651 रुपयांचा निधी तयार होईल. यामध्ये तुमची ठेव रक्कम 18 लाख रुपये असेल आणि तुम्हाला व्याज म्हणून 12,42,651 रुपये मिळतील. 15 वर्षांनंतर पुन्हा एकदा हा आरडी 5 वर्षांसाठी वाढवा. आता 4,910,044 रुपयांचा निधी 20 वर्षांत तयार होईल. यामध्ये तुमची ठेव रक्कम 24 लाख रुपये असेल आणि व्याज म्हणून मिळणारे पैसे 25,10,044 रुपये असतील.
हा आरडी आणखी 5 वर्षांसाठी वाढवला तर 25 वर्षांत 7,487,830 रुपयांचा निधी तयार होईल. यामध्ये तुमची ठेव रक्कम 30 लाख रुपये असेल आणि तुम्हाला 44,87,830 रुपये व्याज मिळतील.
हा निधी एक कोटी रुपये करण्यासाठी, आरडी आणखी एकदा 5 वर्षांसाठी वाढवावी लागेल. 30 वर्षांत या आरडीमध्ये 1 कोटींहून अधिक निधी तयार होईल. या दरम्यान 30 वर्षात 11,046,257 रुपयांचा निधी तयार करण्यात येणार आहे. म्हणजेच 100 कोटींहून अधिक निधी. यामध्ये तुमची जमा रक्कम 36 लाख रुपये असेल आणि तुम्हाला 74,46,257 रुपये व्याज मिळतील.
लक्षात घ्या, RD व्याज दर या 30 वर्षांमध्ये बदलू शकतात. येथे गुंतवणुकीवरील आजच्या व्याजदरांनुसार गणना केली गेली आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला असे वाटत असेल की व्याजदर कमी आहे आणि तरीही तुम्हाला 1 कोटी रुपयांचा निधी तयार करायचा आहे, तर तुम्ही या आरडीमध्ये 10,000 रुपयांपेक्षा जास्त म्हणजेच 500 रुपये किंवा 1000 रुपये वाढवू शकता. या प्रकरणात, व्याजदरातील बदलामुळे तुम्ही उभारत असलेल्या निधीवर परिणाम होणार नाही.