Modi Government : देशातील करोडो शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकार मागच्या काही वर्षांपासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवत आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केंद्र सरकार वर्षाला 6 हजार रुपये देते. हे 6 हजार रुपये दर चार महिन्याला 2-2 हजारच्या स्वरूपात दिले जातात.
तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या या योजनेंतर्गत आतापर्यंत सरकारने शेतकऱ्यांना 12 हप्त्याचे पैसे दिले आहे. तर आता शेतकऱ्यांना 13 व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. तुम्ही देखील 13 व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो समोर आलेल्या माहितीनुसार यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 फेब्रुवारीला पुढील हप्ता जारी करू शकतात.
या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 2019 च्या सुरुवातीला 3.16 कोटींवरून 2022 च्या मध्यापर्यंत 10.45 कोटीपर्यंत वाढणार आहे, असे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी गेल्या आठवड्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेत सांगितले. 13वा हप्ता प्राप्त करण्यासाठी सर्व PM किसान लाभार्थ्यांनी त्यांचे खाते eKYC अपडेट करणे आवश्यक आहे.
सर्वप्रथम PM किसानच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ ला भेट द्या. येथे भारताच्या नकाशावरील पिवळ्या रंगाच्या टॅब “डॅशबोर्ड” वर क्लिक करा. यानंतर एक नवीन पेज उघडेल. यामध्ये तुमचे राज्य, जिल्हा, उपजिल्हा आणि गाव निवडा. शो बटणावर क्लिक करा.
पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या https://pmkisan.gov.in/. उजव्या कोपर्यात, ‘लाभार्थी स्थिती’ टॅबवर क्लिक करा, एक नवीन पेज उघडेल. आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक यापैकी कोणताही एक पर्याय निवडा. याद्वारे तुम्ही तुमच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे की नाही हे तपासू शकता.
केंद्र सरकार दरवर्षी तीन हप्ते जारी करते जेणेकरून शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये मिळू शकतील. अशा परिस्थितीत या वर्षाचा तिसरा आणि पीएम किसान योजनेचा 13वा हप्ता येणे बाकी आहे. शेतकर्यांच्या खात्यावर एका हप्त्यात 2 हजार रुपये जमा होतात.
हे पण वाचा :- iPhone Offers : बाबो .. इतकी भन्नाट ऑफर! आता बंपर डिस्कॉउंटसह घरी आणा आयफोन;अशी करा ऑर्डर