आर्थिक

Multibagger Shares : 10 वर्षात 1 लाखाचे 41 लाख ! ‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणुकदारांना करून दिली बक्कळ कमाई !

Multibagger Shares : शेअर मार्केटमध्ये असे अनेक स्टॉक आहेत, जे गुंतवणूकदारांना उत्तम परतावा देतात. अशातच तुम्हीही सध्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक स्टॉक घेऊन आलो आहोत, ज्याने गुंतवणूकदारांना मागील काळापासून जबरदस्त परतावा दिला आहे.

आम्ही ज्या शेअर बद्दल बोलत आहोत त्याचे नाव टीव्हीएस मोटर असे आहे. या शेअरने दीर्घकालीन गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे. जर आपण या शेअरच्या गेल्या महिन्यातील कामगिरीबद्दल बोललो तर या कंपनीच्या शेअर्समध्ये 0.31 टक्क्यांची किंचित घसरण झाली आणि तो 1,341 रुपयांवर बंद झाला. स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1368.05 रुपये आहे आणि 52 आठवड्यांचा नीचांक 1,289 रुपये आहे. या लार्ज-कॅप कंपनीचे मार्केट कॅप 63787.57 कोटी रुपये आहे. दरम्यान आज हा शेअर 1,345 रुपयांवर बंद झाला.

टीव्हीएस मोटरच्या शेअर्समध्ये गेल्या एका महिन्यात 4 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या 6 महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये 36 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी, गेल्या एका वर्षात 53 टक्के परतावा दिला आहे. तर गेल्या 3 वर्षात 240% चा जबरदस्त परतावा दिला आहे. इतकेच नाही तर या शेअरने गेल्या 10 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 4050% चा चांगला नफा दिला आहे.

TVS मोटरच्या शेअर धारकांनी गेल्या 10 वर्षांत गुंतवणूकदारांना ब्लॉकबस्टर परतावा दिला आहे. गेल्या दशकात शेअर्समध्ये 4050 टक्क्यांची वाढ झाली आहे. जुलै 2013 मध्ये कंपनीच्या एका शेअरची किंमत 32.30 रुपये होती, ती आज 1,341 रुपये झाली आहे. याचा अर्थ या काळात गुंतवणूकदारांच्या पैशात 41 पटीने वाढ झाली आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 10 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याच्याकडे 41 लाख रुपये झाले असते.

तुमच्या माहितीसाठी, TVS मोटर ही जागतिक स्तरावर प्रतिष्ठित दुचाकी आणि तीन-चाकी वाहन उत्पादक कंपनी आहे. कंपनी 80 देशांमध्ये कार्यरत आहे. एक्सचेंजेसकडे उपलब्ध असलेल्या नवीनतम शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, प्रवर्तकांकडे 50.27% तर उर्वरित 49.73% सार्वजनिक भागधारकांकडे आहेत. मार्चमध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक 49% वाढून 410 कोटी झाला आहे, तर ऑपरेशन्समधून मिळणारा महसूल वर्ष-दर-वर्षाच्या तुलनेत 19% वाढून 6,605 कोटी झाला आहे.

Sonali Shelar

Published by
Sonali Shelar

Recent Posts