आर्थिक

Multibagger Stock : गुंतवणूकदारांची चांदी! ‘या’ शेअरने केली 40 लाखांची कमाई, तुम्हीही केलीय का यात गुंतवणूक?

Multibagger Stock : सध्या अनेकजण शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत आहेत. परंतु शेअर मार्केटमध्ये योग्य त्या शेअरमध्ये गुंतवणूक केली तर चांगला परतावा दिला जातो. परंतु जर शेअरची निवड चुकली तर त्याची खूप मोठी किंमत गुंतवणूकदारांना मोजावी लागते.

परंतु मार्केटमध्ये असा एक शेअर असून त्याने दीर्घकालीन गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. मान अॅल्युमिनियम असे या शेअरचं नाव आहे. ज्या गुंतवणूकदारांनी यात 1 लाखांची गुंतवणूक केली होती, त्याचे रूपांतर आता 40 लाखांमध्ये झाले आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या गुंतवणूकदारांना चांगला नफा दिल्यानंतर मान अॅल्युमिनियम कंपनीकडून गुंतवणूकदारांना बोनसही जाहीर करण्यात आला आहे. अशातच ही कंपनी 1:2 च्या गुणोत्तराने स्टॉकचे विभाजन करणार आहे. कंपनीच्या मतानुसार, बोर्डाने पात्र गुंतवणूकदारांना 1:1 गुणोत्तरासह बोनस देणार असल्याची माहिती दिली आहे.

तसेच कंपनीकडून आणखी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. यात कंपनी 10 रुपये दर्शनी मूल्याचा प्रत्येक शेअर प्रत्येकी 5 रुपये दर्शनी मूल्याच्या दोन शेअर्समध्ये विभाजित करणार आहे. यासाठी येत्या काही दिवसांत रेकॉर्ड डेटची माहिती देण्यात येईल.

मागील सात वर्षांत, मान अॅल्युमिनियम कंपनीकडून आपल्या भागधारकांना 4000 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. 24 जून 2016 रोजी बीएसईवर मान अॅल्युमिनियमचा शेअर 7.83 रुपयांच्या पातळीवर असून आज त्याची किंमत 322.90 रुपये इतकी आहे. अशाप्रकारे मागील सात वर्षांत मान अॅल्युमिनियमच्या शेअरच्या किमतीत 4023.88 टक्क्यांची वाढ झाली आहे.

समजा सात वर्षांपूर्वी जर एखाद्या गुंतवणूकदाराने मान अॅल्युमिनियम कंपनीमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असल्यास त्या गुंतवणूकदाराला आज 41 लाखांहुन जास्त नफा मिळाला असता. केवळ 5 दिवसांत मान अॅल्युमिनियमचा हिस्सा 36.58 टक्क्यांनी वाढला असून मागील एका महिन्यात स्टॉक 73.66 टक्क्यांनी वाढला आहे. तसेच, मागील एका वर्षात मान अॅल्युमिनियमच्या स्टॉकमध्ये 181.97 टक्क्यांची वाढ दिसली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts