आर्थिक

Multibagger Stocks : 89 रुपयांच्या ‘या’ शेअरने गुंतवणूकदारांना केले करोडपती, बघा…

Multibagger Stocks : बांधकामापासून ते सिंचन, खाणकाम आणि रेल्वेच्या बांधकामापर्यंत सर्व गोष्टींमध्ये गुंतलेली NCC या कंपनीच्या शेअर्सनी केवळ दीर्घकालीन गुंतवणूकदारांचे खिसे भरले नाहीत तर अल्पकालीन गुंतवणूकदारांचाही फायदा केला आहे.

एके काळी एक रुपयापेक्षा कमी किंमत असलेल्या या शेअरची किंमत आता १६३ रुपये झाली आहे. गेल्या वर्षभरात या मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांच्या पैशांमध्ये अडीच पट वाढ केली आहे. ब्रोकरेजच्या मते, NCC शेअर्सची गती अद्याप थांबलेली नसून सध्याच्या पातळीपासून 31 टक्क्यांपर्यंत जाऊ शकते.

आज 16 ऑक्टोबर रोजी NSE वर 12:15 वाजता, हा शेअर थोड्या वाढीसह 163.25 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होता. गेल्या एका महिन्यात या शेअरमध्ये सुमारे नऊ टक्क्यांची वाढ झाली असून गेल्या सहा महिन्यांत या शेअरने गुंतवणूकदारांना सुमारे 50 टक्के परतावा दिला आहे. NCC च्या मल्टीबॅगर स्टॉकने 2023 मध्ये 78 टक्के परतावा दिला आहे. जर आपण त्याच्या वार्षिक परताव्याबद्दल बोललो तर ते 133 टक्के आहे.

55 हजाराच्या गुंतवणुकीत कोटींचा फायदा

NCC शेअर्सची दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मोठा नफा दिला आहे. सुमारे 22 वर्षांपूर्वी 5 ऑक्टोबर 2001 रोजी या शेअरची किंमत केवळ 89 पैसे होती. त्यावेळी जर एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये 55 हजार रुपये गुंतवले असतील आणि ते आजपर्यंत कायम ठेवले असेल तर आज त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य 1 कोटी रुपये झाले आहे कारण आता त्याची किंमत 163 रुपये झाली आहे.

शेअरची कामगिरी

दरम्यान, जून तिमाहीत, NCC चा एकत्रित महसूल वार्षिक 31.89 टक्क्यांनी वाढून 4380 कोटी झाला आहे आणि नफा 33 टक्क्यांनी वाढून 409 कोटी झाला आहे. जून तिमाहीत, त्याला 8154 कोटी रुपयांच्या ऑर्डर्स मिळाल्या, जे वार्षिक आधारावर 83 टक्के अधिक होते आणि त्याची ऑर्डर बुक 54110 कोटी रुपयांवर पोहोचली. त्याच्या ऑर्डर बुकमध्ये सर्वात मोठी ऑर्डर यूपी जल जीवन जल प्रकल्पाची आहे ज्याची किंमत 16500 कोटी रुपये आहे.

Renuka Pawar

Recent Posts