आर्थिक

म्यूचुअल फंड असावा तर असा ! ‘या’ फंडने एका लाखाचे बनवलेत 29 लाख, गुंतवणूकदार झालेत मालामाल

Mutual Fund Investment Scheme : गेल्या काही दिवसांपूर्वी देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला. यामध्ये भारतीय जनता पार्टीने तीन राज्यांमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे.

तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार स्थापित झाले आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड मध्ये बीजेपीने सत्ता स्थापित केली आणि तामिळनाडूमध्ये काँग्रेसने मुसंडी मारली आहे. दरम्यान, या विधानसभा निकालानंतर भारतीय शेअर बाजारात मोठी तेजी आली आहे. 11 डिसेंबरपर्यंत शेअर बाजार तेजीत होता.

पण काल अचानक बीएसई अर्थातच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स ३७७ अंकांनी घसरला. पण त्याआधी बाजारात विक्रमी तेजी आली होती. बाजारातील याच तेजीच्या जोरावर सेन्सेक्सने ७० हजाराचा टप्पा गाठला आहे.

परिणामी शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना देखील या तेजीचा फायदा मिळाला आहे. अशा परिस्थितीत आज आपण अशा एका म्युच्युअल फंडबाबत माहिती जाणून घेणार आहोत ज्या म्युच्युअल फंडने गुंतवणूकदारांचे एका लाखाचे 29 लाख रुपये बनवले आहेत.

कोणता आहे तो Mutual Fund

आम्ही ज्या म्युच्युअल फंड बाबत बोलत आहोत तो आहे आईसीआईसीआई प्रूडेंशियल इक्विटी एंड डेट फंड. या म्युच्युअलफंडची कामगिरी सातत्याने सुधारत आहे. या फंडने गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.

या Mutual Fund ची स्थापना नोव्हेंबर 1999 मध्ये झाली. म्हणजेच या फंडची स्थापना होऊन आता जवळपास 24 वर्ष झाली आहेत. दरम्यान, ज्यावेळी हा फंड स्थापित झाला त्यावेळी जर कोणी या म्युच्युअल फंड मध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील तर ती गुंतवणूक आता 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत 29 लाख 33 हजाराची झाली असेल.

म्हणजेच एका लाखाच्या गुंतवणुकीत गुंतवणूकदारांना 29 लाखाहून अधिकचा परतावा या ठिकाणी मिळाला आहे. म्हणजे या Mutual Fund ने 15.06% चा CAGR दिला आहे. तसेच याच कालावधीत निफ्टी 50 TRI (अतिरिक्त बेंचमार्क) ने 13.48% चा CAGR दिला आहे.

म्हणजे यात 1 लाख गुंतवणूक करणाऱ्यांचे गुंतवणुकीचे मूल्य 21.03 लाख रुपये झाले असते. याचा अर्थ असा की हा फंड कमी इक्विटी एक्सपोजरसह, निफ्टीला मागे टाकण्यात सक्षम राहिला आहे. तसेच जर एखाद्या गुंतवणूकदाराने या आईसीआईसीआई प्रूडेंशियल इक्विटी एंड डेट फंडात दरमहा 10 हजार रुपयांची एसआयपी केली असेल

तर यावेळी अशा गुंतवणूकदाराच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.8 कोटी रुपये झाले असेल. दहा हजाराची एसआयपी केली असेल तर आत्तापर्यंत गुंतवणूकदाराची निव्वळ गुंतवणूक फक्त 28.9 लाख रुपये एवढी झाली असेल. याचाच अर्थ या फंडने 16.12% दराने परतावा दिला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts