Mutual Funds SIP : सध्या एसआयपी ही सर्वात लोकप्रिय गुंतवणूक होत चालली आहे. कारण येथे इतर गुंतवणुकीपेक्षा किती तरी पटीने जास्त परतावा मिळतो. एसआयपी द्वारे तुम्ही अगदी लहान बचत करून मोठा निधी गोळा करू शकता. पण एसआयपीमध्ये गुंतवणूक करताना अशा काही चुका आहेत ज्या तुम्ही टाळल्या पाहिजेत.
खरं तर गुंतवणुकीमुळे तुमचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होण्यास मदत होते. सध्या बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडांमध्ये तुम्ही भरपूर परतावा मिळवू शकता.
म्युच्युअल फंड SIP मध्ये गुंतवणुकीचे 4 प्रमुख फायदे :-
-गुंतवणूकदार त्यांच्या सोयीनुसार मासिक, त्रैमासिक किंवा अर्धवार्षिक आधारावर SIP मध्ये गुंतवणूक करू शकतात. गुंतवणुकीची रक्कम कधीही वाढवली किंवा कमी केली जाऊ शकते. यामध्ये दीर्घकाळासाठी मोठा फायदा होतो.
-यामध्ये गुंतवणूक केल्याने चक्रवाढीचा प्रचंड फायदा होतो. म्हणजेच गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावर व्याज दिले जाते. त्यामुळे असे म्हटले जाते की, एसआयपी जितकी जास्त ठेवली जाईल तितका जास्त फायदा होतो.
-रुपयाच्या सरासरी खर्चाचाही फायदा होतो. म्हणजे जेव्हा बाजारात कमजोरी असते तेव्हा जास्त युनिट्स खरेदी करता येतात. परंतु जसजसा वेग वाढेल तसतसे वाटप केलेल्या युनिट्सची संख्या कमी होईल.
-एसआयपीद्वारे गुंतवणूक आणि बचत करण्याची सवय लागते. यातून शिस्तबद्ध गुंतवणुकीची सवय लागते.
‘या’ चुका टाळा :-
-जेव्हा तुम्ही कोणत्याही फंडात गुंतवणूक करता तेव्हा त्याबाबत योग्य मार्केट रिसर्च करा. संशोधनाशिवाय केलेली गुंतवणूक तुम्हाला अडचणीत आणू शकते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही आर्थिक सल्लागाराचीही मदत घेऊ शकता.
-एकदा का तुम्ही SIT सुरू केल्यावर, मध्येच थांबवण्याची चूक करू नका. अन्यथा तुम्ही तुमचे नफ्याचे लक्ष्य साध्य करू शकणार नाही.
-अनेक वेळा असे घडते की जास्त पैसे कमावण्यासाठी, कोणत्याही शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवले जातात.
-बाजारातील तात्पुरत्या चढउतारांवर आधारित कधीही गुंतवणूक करू नका.
-संपूर्ण पैसा एकाच ठिकाणी गुंतवण्याची चूकही टाळली पाहिजे.