Mutual Funds : आता गुंतवणुकीचे खूप पर्याय उपलब्ध आहेत. अनेकजण जोखीम घेऊन गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. समजा आता SIP मध्ये गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे.
नाहीतर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या याचा चुकीमुळे तुमचा म्युच्युअल फंड रद्द होऊ शकतो. म्युच्युअल फंडात SIP च्या माध्यमातून गुंतवणूक करण्यापूर्वी त्याविषयी योग्य माहिती मिळवा, पुढे तुम्हाला कोणतीही अडचण होणार नाही.
काही गुंतवणूकदार म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करत असताना अशा चुका करतात, ज्यामुळे त्यांना चांगला परतावा मिळवत नाही. त्यासाठी काही चुका टाळणे गरजेचे आहे.
संशोधन न करता गुंतवणूक
समजा एखाद्या व्यक्तीने कोणतेही संशोधन न करता गुंतवणूक केल्यास त्याला एसआयपीद्वारेही तोटा होण्याची शक्यता असते. तसेच कोणत्याही फंडामध्ये गुंतवणूक करत असताना नेहमी त्याची मागील कामगिरी, दृष्टीकोन आणि खर्चाचे प्रमाणाची तुलना करावी.
आर्थिक उद्दिष्टे करा निश्चित
म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करत असताना अनेक गुंतवणूकदारांनी केलेली चूक म्हणजे ते त्यांचे आर्थिक उद्दिष्ट निश्चित नसते. त्यामुळे त्यांना त्यांच्या गरजेनुसार गुंतवणूक करता येत नाही. शिवाय त्यांना परतावा देखील खूप कमी मिळतो.
बाजाराची वेळ
अनेक गुंतवणूकदार बाजाराला वेळ देण्याची चूक करतात. बाजार उच्च पातळीच्या जवळ असूनही पैसे काढतात. याचा परिणाम असा होतो की ज्यावेळी बाजार नवीन उच्चांक बनवतो त्यावेळी गुंतवणूकदारांना त्याचा लाभ मिळत नाही.
विविधता
यशस्वी गुंतवणुकीसाठी विविधता खूप महत्त्वाची असून म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करत असताना सतत विविधतेवर भर द्यावी. स्मॉल कॅप, लार्ज कॅप आणि मिडकॅप या तिन्ही प्रकारच्या फंडांना त्यांच्या जोखीम प्रोफाइलवर आधारित स्थान द्यावे.
परतावा तपासणे
समजा आता तुम्ही दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करत असल्यास तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये उपस्थित असणाऱ्या म्युच्युअल फंडाचा परतावा सतत तपासत राहावा. जर म्युच्युअल फंड नकारात्मक परतावा देत असल्यास किंवा बाजारानुसार कामगिरी करत नसेल, तर त्यातून बाहेर पडा.