आर्थिक

National Pension System : पेन्शनधारकांसाठी मोठे अपडेट ! पैसे काढण्याच्या नियमात मोठा बदल !

National Pension System : नॅशनल पेन्शन सिस्टमच्या (NPS) गुंतवणूकदारांसाठी एक मोठी बातमी आहे. तुम्हीही तुमचे पेन्शनचे पैसे काढण्याचा विचार करत असाल तर आता त्या नियमात मोठा बदल झाला आहे. राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अंतर्गत पैसे काढण्याचे नियम बदलले आहेत. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) ने याबाबत माहिती दिली आहे.

पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) ने नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) अंतर्गत गुतवणूकदारांना पैसे काढण्यासाठी ‘पेनी ड्रॉप’ पडताळणी अनिवार्य केली आहे. यामुळे गुंतवणूकदारांच्या पैशाचे वेळेवर हस्तांतरण सुनिश्चित होईल.

‘पेनी ड्रॉप’ (Penny Drop) प्रक्रियेअंतर्गत, केंद्रीय रेकॉर्ड ठेवणारी संस्था (CRAs) बँक बचत खात्याची वास्तविक आणि सक्रिय स्थिती पाहतात. आणि बँक खाते क्रमांक आणि ‘कायम सेवानिवृत्ती खाते क्रमांक’ (Permanent Retirement Account Number) किंवा दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये दिलेले नाव यांच्याशी जुळवून पाहतात.

सर्व पेन्शन काढण्यासाठी नियम लागू होतील

हा नियम NPS, अटल पेन्शन योजना आणि NPS Lite मधील सर्व प्रकारच्या पैसे काढण्यासाठी तसेच ग्राहकांच्या बँक खात्याच्या तपशिलातील बदलांना लागू होतील.

पेनी ड्रॉप म्हणजे काय?

लाभार्थ्‍याच्‍या बँक खात्‍यामध्‍ये थोडीशी रक्कम जमा करून आणि पेनी ड्रॉप प्रतिसादावर आधारित नाव जुळवून व्यवहाराची तपासणी करून खात्याची वैधता पडताळली जाते.

PFRDA च्या अलीकडील अधिसूचनेनुसार, “पेनी ड्रॉप व्हेरिफिकेशन नाव जुळण्यासाठी, एक्झिट/विथड्रॉवल ऍप्लिकेशन्सवर प्रक्रिया करण्यासाठी आणि ग्राहकांच्या बँक अकाऊंटच्या तपशीलात बदल करण्यासाठी पेनी ड्रॉप व्हेरिफिकेशन यशस्वी होणं आवश्यक असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Sonali Shelar

Published by
Sonali Shelar

Recent Posts