New Rules from 1st October : नवीन महिना सुरू होत आहे. अशातच काही नियमांमध्ये बदल होणार आहे. तसेच अनेक महिन्यांमध्ये ऑक्टोबर हा विशेष असतो, कारण या महिन्यात सणासुदीचे दिवस असतात, यासोबतच काही नवीन नियमही लागू होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सामान्यांच्या खिशावर होणार आहे. यासोबतच परदेश प्रवासावरील टीसीएसच्या नियमांसोबतच जन्म प्रमाणपत्राबाबतचे नियमही बदलत आहेत. जन्म-मृत्यू नोंदणी कायदा लागू केला जात आहे. 1 ऑक्टोबरपासून कोणते बदल होणार आहेत, चला जाणून घेऊया…
1 ऑक्टोबरपासून बदलणार हे नियम :-
1.TCS नियम
नवीन TCS नियम 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू होणार आहेत. आता तुम्ही परदेशात तुमच्या क्रेडिट कार्डवर 7 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च केल्यास तुम्हाला त्यावर 20 टक्के TCS भरावा लागेल. मात्र, हा खर्च वैद्यकीय किंवा शिक्षणावर असेल तर त्यावर 5 टक्के टीसीएस आकारला जाईल. तुम्ही परदेशात शिक्षणासाठी कर्ज घेतल्यास, 7 लाख रुपयांपेक्षा जास्त मर्यादेवर TCS 0.5 टक्के दराने आकारले जाईल.
3. लहान बचत योजना
अल्प बचत योजनेच्या विद्यमान ग्राहकांनी 30 सप्टेंबरपर्यंत त्यांचा आधार क्रमांक न दिल्यास त्यांची खाती 1 ऑक्टोबर 2023 रोजी बंद केली जातील. ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS), सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) किंवा पोस्ट ऑफिस प्लॅन यासारख्या लहान बचत योजना 30 सप्टेंबरपर्यंत सुरू ठेवण्यासाठी आधार क्रमांक प्रदान करणे आवश्यक आहे.
2. जन्म प्रमाणपत्र
आता जन्म प्रमाणपत्र हे अनेक गोष्टी सिद्ध करण्यासाठी एकच कागदपत्र असेल. आता नवीन नियमांनुसार जन्म-मृत्यूची नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. जन्म आणि मृत्यू नोंदणी (सुधारणा) कायदा, 2023 1 ऑक्टोबरपासून लागू होत आहे. या नियमानुसार जन्म-मृत्यूची नोंदणी करणे बंधनकारक होणार आहे. गृह मंत्रालयाने 13 सप्टेंबर रोजी याबाबत अधिसूचना जारी केली होती. शाळांमध्ये प्रवेश, वाहन चालविण्याचा परवाना जारी करणे, मतदार यादी तयार करणे, विवाह नोंदणी, सरकारी नोकरी, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पासपोर्ट जारी करणे आणि आधार क्रमांक यासह विविध प्रक्रियेसाठी हे प्रमाणपत्र महत्त्वाचे असेल.
4. 2,000 रुपयांच्या नोटा चलनातून जाणार
रिझर्व्ह बँकेने मे महिन्यात चलनातून 2,000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती, त्यानंतर ज्यांच्याकडे या नोटा आहेत त्यांना 30 सप्टेंबरपर्यंत बँकेत जाऊन त्या जमा करता येणार नाहीत, 2,000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी फक्त आजचा एकच दिवस शिल्लक आहे.