Senior Citizen Savings Scheme : वाढत्या महागाईमुळे भविष्याचा विचार करणे फारच महत्वाचे बनले आहे. आतापसूनच जर आपण भविष्याचा विचार करून बचत करायला सुरुवात केली तर आपण आपले पुढील आयुष्य अगदी आरामात काढतो. अशातच सरकारद्वारे अनेक निवृत्ती योजना राबवल्या जात आहेत, ज्यात गुंतवणूक करून आपण चिंता मुक्त राहू शकतो.
भविष्याचा विचार करून आपण सर्वजण अशा अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून आपण निवृत्तीनंतर आरामदायी जीवन जगू शकू. मात्र, माहितीच्या अभावामुळे आपण त्या योजनांचा लाभ घेऊ शकत नाही. म्हणूनच, आज आम्ही तुम्हाला अशा योजनेबद्दल सांगणार आहोत जी भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या योजनेत इतर अनेक योजनांपेक्षा जास्त परतावा मिळू शकतो.
आपण ज्या योजनेबद्दल बोलत आहोत ती म्हणजे ज्येष्ठ नागरिक बचत योजना. अलीकडच्या काळात असे दिसून आले आहे की आपण ज्या योजना घेतो त्यावर हवा तसा परतावा मिळत नाही. तसेच त्यातून फारसा फायदा मिळत नाही. पण ही योजनातुम्हाला ८.२ टक्के परतावा देते. याचा अर्थ निवृत्तीनंतरही या योजनेत तुम्हाला बँकेकडून अधिक परतावा मिळू शकतो.
या योजनेत कोण गुंतवणूक करू शकतो?
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तसेच, जर एखाद्या नागरिकाने VRS घेतले असेल तर तो 1000 रुपयांपासून ही योजना सुरू करू शकतो. म्हणजेच, आपण असे म्हणू शकतो की या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही मोठ्या रकमेची आवश्यकता नाही.
३० लाख रुपयांपर्यंत करू शकता गुंतवणूक
होय, या योजनेत तुम्ही ३० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. यापूर्वी त्याची मर्यादा १५ लाख रुपये होती. ही योजना तुम्ही खाते उघडल्याच्या तारखेपासून ५ वर्षांनी परिपक्व होते. म्हणजेच तुम्ही ५ वर्षानंतर पैसे काढू शकता. जर आपण व्याजाबद्दल बोललो तर व्याज तिमाही आधारावर दिले जाते.