आर्थिक

आता अवतरणार बीएसएनएलचे युग! 108 रुपयांचा रिचार्ज प्लान देत आहे भन्नाट सुविधा; वाचाल तर वळाल बीएसएनएलकडे

स्मार्टफोनच्या या युगामध्ये इंटरनेट शिवाय व्यक्तीला पर्याय नाही आणि इंटरनेटच्या मदतीने सगळी काही कामे अगदी चुटकी सरशी करणे देखील आता शक्य झालेली आहे. त्यामुळे रिचार्ज प्लानला खूप महत्त्व आहे. भारताचा विचार केला तर भारतामध्ये प्रामुख्याने जीओ तसेच एअरटेल आणि वोडाफोन -आयडिया सारख्या खाजगी कंपन्या असून या कंपन्यांचे अनेक ग्राहक भारतामध्ये आहे.

परंतु या तिन्ही कंपन्यांनी  3 जुलैला त्यांच्या रिचार्ज दरांमध्ये मोठी वाढ केली व त्यामुळे या कंपन्यांच्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता ग्राहक स्वस्त रिचार्ज प्लानच्या वा स्वस्त रिचार्ज प्लान असलेल्या नेटवर्ककडे वळताना आपल्याला दिसून येत आहेत.

या सगळ्या मध्ये जर बघितले तर ग्राहकांसाठी भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएल हा एक उत्तम पर्याय ठरेल अशी सध्या स्थिती आहे.

सध्या बीएसएनएलने अनेक स्वस्तातले रिचार्ज प्लान्स आणल्यामुळे येणाऱ्या कालावधीत बीएसएनएलच्या ग्राहक संख्येत वाढ होण्याची देखील शक्यता आहे.

 हे आहेत बीएसएनएलचे सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान

1- बीएसएनएलचा १०७ रुपयाचा रिचार्ज प्लान बीएसएनएलच्या माध्यमातून 107 रुपयांचा रिचार्ज प्लान आणण्यात आला आहे व चक्क या प्लॅनमध्ये तुम्हाला 35 दिवसांची व्हॅलिडीटी मिळणार आहे. जर आपण इतर दूरसंचार कंपन्यांच्या रिचार्ज प्लानशी तुलना केली तर एसएनएलचा हा 107 रुपयांचा रिचार्ज प्लान खूपच परवडणार आहे.

या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग मिळणार असून 220 मिनिटांची कॉलिंग सुविधा देखील मिळणार आहे. परंतु या प्लानमध्ये डेटा फक्त तीन जीबी इतकाच मिळणार आहे.

2- बीएसएनएलचा 108 रुपयांचा रिचार्ज प्लान तुम्हाला जर डेटा हवा असेल तर तुम्ही 107 रुपयांच्या प्लान ऐवजी बीएसएनएलचा 108 रुपयांचा रिचार्ज प्लान वापरू शकतात.

या प्लानमध्ये तुम्हाला दररोज एक जीबी डेटा आणि सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल व तीही 28 दिवसांसाठी.त्यामुळे हा प्लान तुमच्यासाठी खूप फायद्याचा राहील.

 बीएसएनएलने देशात सुरू केली 4G सेवा

तसेच या कंपन्यांच्या स्पर्धेत टिकावे याकरिता बीएसएनएलने ग्राहकांसाठी एक मोठी भेट दिली असून त्यांनी देशांमध्ये 4G सेवा सुरू केली आहे व त्यामुळे आता बीएसएनएलच्या माध्यमातून देखील वेगात इंटरनेट पोहोचवण्याच्या दिशेने महत्त्वाची पावले उचलली गेली आहेत.

एवढेच नाही तर याही पुढे जात आता कंपनीच्या माध्यमातून 5G तंत्रज्ञानाच्या चाचण्या देखील सुरू करण्यात आलेले आहे. त्यामुळे येणाऱ्या कालावधीत बीएसएनएल उचलत असलेल्या या पावलांमुळे नक्कीच उत्तम स्पर्धा निर्माण होऊन ग्राहकांना देखील एक चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts