Online Fraud Alert : पूर्वीपेक्षा आता फसवणुकीचे प्रमाण खूप वाढले आहे. कारण लोक पूर्वी ऑनलाईन पेमेंट पद्धत वापरत नव्हते. मागील काही वर्षांपासून ऑनलाईन पेमेंटचा वापर जास्त होऊ लागला आहे. परंतु ऑनलाइन बँकिंग आल्यानंतर हॅकर्स खूप सक्रिय झाले आहेत.
त्यामुळे या फसवणुकीला आळा घालण्यासाठी ग्राहकांनी जागरूक राहणे खूप गरजेचे आहे. अनेकांना माहिती नसल्याने त्यांच्या बँक खात्यातून एका झटक्यात लाखो रुपये जात आहेत. तुम्ही आता हे थांबवू शकता. त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार आहेत.
असे सुरक्षित करा तुमचे नेट बँकिंग
मजबूत पासवर्ड ठेवा
सर्वात महत्त्वाचे म्हणजे नेट बँकिंगसाठी सर्वात अगोदर पासवर्डसाठी फोन नंबर किंवा नावे यासारख्या सामान्य गोष्टी वापरू नका. तुम्हाला मजबूत पासवर्डसाठी काहीतरी ठेवता येईल जसे की – UP95@74PP.
सर्वत्र लॉग इन करणे टाळा
तुम्ही चुकूनही तुमच्या नेट बँकिंगमध्ये इतर कोणत्याही सिस्टीममध्ये किंवा इतर कोणत्याही फोनमध्ये लॉग इन करू नका. तुम्ही जर असे केले तर तुमच्या पासवर्डची चोरी होऊ शकते. त्यामुळे तुम्ही तुमच्या सुरक्षित प्रणालीवर किंवा सुरक्षित फोनवरच लॉग इन करावे.
ब्राउझरमध्ये आयडी पासवर्ड सेव्ह करणे टाळा
बऱ्याच वेळा असे दिसून येते की अनेकजण त्यांच्या नेट बँकिंगमध्ये लॉग इन करत असताना ब्राउझरवर पासवर्ड सेव्ह करत असतात, ज्यामुळे त्यांना पुन्हा लॉगिन करताना पासवर्ड टाकावा लागू नये. परंतु तुम्ही चुकूनही अशी चूक करू नये. त्यामुळे तुमचे नेट बँकिंग धोक्यात येईल.
वापरू नका थर्ड पार्टी अॅप्स
नेट बँकिंग लॉगिन करत असताना तुम्ही कोणतेही थर्ड पार्टी अॅप वापरू नये. जर तुम्ही असे केले तर तुम्ही फसवणुकीचे बळी पडू शकता. त्यामुळे तुमच्या बँकेच्या अधिकृत अॅपवर नेहमी लॉग इन करून फसवणूक टाळा.