आर्थिक

Mashroom Farming : मशरूम शेतीतून महिन्याला 10 लाख कमावतोय हा शेतकरी ! वाचा संपूर्ण स्टोरी…

Mashroom Farming : जेव्हा संपूर्ण जगावर आणि भारतावर देखील कोरोनाचे सावट होते त्या कालावधीमध्ये संपूर्ण देशाला प्रचंड प्रमाणात मोठ्या त्रासातून जावे लागले. ज्याप्रमाणे कोरोनाचा त्रास आरोग्याच्या दृष्टिकोनातून होता. अगदी त्याचप्रमाणे तो आर्थिक दृष्टिकोनातून देखील मोठ्या प्रमाणावर होता.

कारण कोरोना कालावधीमध्ये लावण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे सगळे व्यवसाय ठप्प झालेले होते व जे लोक नोकरीमध्ये होते त्यांच्या देखील नोकऱ्या या कालावधीत गेल्या होत्या व त्यामुळे बेरोजगारीची कुऱ्हाड अनेक जणांवर कोसळली होती. त्यामुळे या कालावधीत पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक जणांनी छोटे-मोठे व्यवसाय करायला सुरुवात केलेली होती

व काहीजण तर स्वतःच्या गावी येऊन शेती करायला लागलेले होते. या सगळ्यांमध्ये जर आपण बघितले तर एक उद्योजक शशी भूषण तिवारी हे असे होते की, त्यांना देखील कोरोना महामारीच्या काळात मोठ्या प्रमाणावर त्रास झाला व त्यांची देखील हाताची नोकरी गेली. परंतु शशी भूषण यांनी हार न म्हणता गावी येऊन मशरूम शेतीला सुरुवात केली व संपूर्ण जीवनच त्यांचे त्यामुळे बदलून गेले.

 शशी भूषण तिवारी यांनी मशरूम शेतीतून साधली आर्थिक प्रगती

कोरोना कालावधीमध्ये ज्याप्रमाणे अनेकांना नोकरी गमवावी लागली व आर्थिक झळ सोसावी लागली. तशीच झळ बिहारमधील उद्योजक शशी भूषण यांना देखील सोसावी लागली. परंतु त्यांनी हार न मानता गावी येऊन मशरूम शेती सुरू केली व पूर्ण जीवनातच त्यांचा त्यामुळे बदल घडून आला.

कोरोना आधीच्या कालावधीमध्ये शशी भूषण हे पूर्वी दिल्लीमध्ये भाजीपाल्याचा व्यवसाय करायचे.  कोरोना महामारीच्या काळामध्ये त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले व ते शेवटी नाईलाजाने आपल्या कुटुंबासह बिहारमधील मुजफ्फरपुर या त्यांच्या गावी आले.

परंतु पोटाची खडगी भरण्यासाठी काहीतरी करणे गरजेचे होते व त्यामुळे त्यांनी गावी येऊन शेती करण्याचा निर्णय घेतला व स्वतःच्या शेतामध्ये बटन मशरूमची लागवड करण्याचे ठरवले. त्यांचा आयुष्याचा मार्ग सुरू झाला व आज त्यांनी मागे वळून न पाहता या दोन-तीन वर्षांमध्ये या व्यवसायात चांगलाच जम बसवला असून यातून ते लाखो रुपयांची कमाई देखील करत आहे.

 अशाप्रकारे केली मशरूम शेतीला सुरुवात

मशरूम शेती करावी हे निश्चित केल्यानंतर त्यांनी सुरुवात करताना तयारी म्हणून PUF पॅनल्स आणि एअर कंडिशनर सारखे आधुनिक तंत्रज्ञाचा वापर करायला सुरुवात केली व एका छोट्याशा खोलीतून व्यवसायाला सुरुवात करून मशरूम लागवड केली व त्या छोट्या खोलीतच मशरूम वाढवायला सुरुवात केली.

सुरुवातीलाच त्यांना चांगले यश मिळायला लागले व हळूहळू यश मिळाल्याचे पाहून त्यांच्यामध्ये उत्साह संचारला व त्यांनी व्यवसायाचा विस्तार करायला सुरुवात केली. विस्तार करत करत आज त्यांच्याकडे मशरूम उत्पादनासाठी 20 खोल्या असून त्या माध्यमातून ते दीड ते दोन टन मशरूमचे उत्पादन दररोज घेतात.

विशेष म्हणजे या दररोजच्या उत्पादनातून त्यांना प्रत्येक दिवसाला दोन लाख रुपये कमाई होते. यामध्ये मशरूम लागवडीचा सर्व खर्च व असलेल्या कर्मचाऱ्यांचा पगार वजा केल्यानंतर त्यांना महिन्याला निव्वळ नफा 10 लाख पेक्षा जास्त राहतो. विशेष म्हणजे शशी भूषण यांनी मशरूम व्यवसायामुळे स्वतःची प्रगती तर केलीच

परंतु इतर शंभर महिला व पुरुषांना देखील त्यांनी रोजगार निर्माण करून त्यांचा देखील रोजगाराचा प्रश्न मिटवला. त्यांच्या मशरूम उत्पादनाचे वैशिष्ट्य म्हणजे खर्च कमी करण्यासाठी ते स्वतः मशरूम स्पॉन म्हणजेच मशरूमची बियाणे तयार करतात व त्यांनी स्वतःचा मशरूमचा कॅनिंग प्लांट देखील उभारला आहे.

या व्यवसायाबद्दल बोलताना ते म्हणतात की हा एक उत्पन्न वाढवण्याचा चांगला पर्याय असून कॉलेज विद्यार्थी देखील पार्ट टाइममध्ये हा व्यवसाय करू शकतात. शशी भूषण यांच्या मुलाने देखील आता कॅन केलेला मशरूम ऑनलाइन विकण्यास सुरुवात केली असून  येणाऱ्या भविष्यकाळात मशरूम शेतीकडे त्यांचा कल असणार असून त्याच दृष्टीने ते प्रयत्न करत आहेत.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts