आर्थिक

एफडी करून जास्त पैसे मिळवण्याची संधी! ‘या’ बँकेने वाढवली विशेष एफडीमध्ये गुंतवणूक करण्याची मुदत आणि वाढवले व्याजदर

Punjab And Sind Bank Special FD:- मुदत ठेव योजना म्हणजेच फिक्स डिपॉझिट योजनांना गुंतवणूकदारांकडून खूप मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिले जाते.कारण मुदत ठेव योजनेमध्ये केलेली गुंतवणुक सुरक्षित राहते आणि परतावा देखील चांगला मिळतो. अनेक बँकांच्या माध्यमातून एफडी योजना राबवल्या जातात व काही विशेष एफडी योजना देखील बँकांच्या माध्यमातून राबवल्या जातात.

किती कालावधीसाठी तुम्ही एफडी करत आहात त्यावर व्याजदर अवलंबून असतो. यामध्ये जर पंजाब आणि सिंध बँकेचा विचार केला तर नुकतीच या बँकेने त्यांच्या कोट्यावधी ग्राहकांना एक अमूल्य अशी भेट दिली आहे.

या बँकेने आपल्या विशेष एफडीमध्ये गुंतवणुकीची अंतिम मुदत वाढवली असून या विशेष कालावधीच्या एफडीमध्ये गुंतवणूक करण्याची वेळ या अगोदर 31 डिसेंबर 2024 पर्यंत होती.

परंतु ती आता 31 मार्च 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. याशिवाय बँकेने त्यांच्या नियमित एफडीवरील व्याजदरात देखील सुधारणा केली आहे व हे नवीन दर आता एक जानेवारी 2025 पासून लागू केले गेले आहेत.

पंजाब आणि सिंध बँकेची विशेष एफडी योजनेचे स्वरूप
पंजाब आणि सिंध बँक आपल्या ग्राहकांना 222 दिवस,333 दिवस आणि 444 दिवसांची विशेष एफडी ऑफर करत आहे.या विशेष एफडीवर कमाल 8.05% इतके व्याज देण्यात येते.

तसेच बँकेच्या वेबसाईट नुसार बघितले तर बँक 222 दिवसांच्या एफडीवर 7.05%, 333 दिवसांच्या एफडीवर 7.10% आणि 444 दिवसांच्या एफडीवर 7.25% व्याज देत आहे.

तसेच या बँकेच्या माध्यमातून सुपर ज्येष्ठ नागरिकांना 444 दिवसांच्या एफडीवर 8.05% व्याज देत आहे तर ज्येष्ठ नागरिकांना 0.50% अतिरिक्त व्याजाचा लाभ मिळणार आहे.तर अति ज्येष्ठ नागरिकांना 0.50% व्यतिरिक्त 0.15% अतिरिक्त व्याज मिळते.

एक जानेवारी 2025 पासून बँकेने सुधारित केलेले एफडीच्या कालावधीनुसार व्याजदर


सात ते 14 दिवसांच्या एफडीकरिता चार टक्के, 15 ते 30 दिवसांच्या एफडी करिता चार टक्के, 31 ते 45 दिवसांच्या एफडी करिता 4.25%, 46 ते 90 दिवसांच्या एफडी करता 4.50%, 91 ते 120 दिवसांच्या एफडी करिता 4.50%, 121 ते 150 दिवसाच्या एफडी करिता 4.75%,

151 ते 179 दिवसांच्या एफडीकरिता सहा टक्के,१८० ते २६९ दिवसांच्या एफडीकरिता 5.25%, 270 ते 332 दिवसांच्या एफडीकरिता 5.50%, 333 दिवसांच्या एफडीकरिता 7.20%, 334 ते एक वर्षापेक्षा कमी कालावधी करिता 5.50%,एक वर्ष कालावधी करिता 6.30%,

एक वर्ष ते 443 दिवसांकरिता सहा टक्के, 444 दिवसांकरिता 7.30%, 445 ते 554 दिवसांकरिता सहा टक्के, 556 दिवस ते 22 महिन्यांपेक्षा कमी कालावधी करिता सहा टक्के, 22 महिने कालावधी करिता सात टक्के,

22 महिने ते दोन वर्षापेक्षा कमी कालावधी करिता सहा टक्के, दोन वर्ष ते 776 दिवसांच्या कालावधी करीता 6.30%, 777 दिवसांकरिता 7.25%,778 ते 998 दिवसांच्या एफडी करिता 6.30% अशाप्रकारे कालावधीनुसार एफडीच्या व्याजदरात सुधारणा करण्यात आली आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts