आर्थिक

Home Loan Tips : होमलोन घेताना ‘या’ गोष्टींवर ठेवा लक्ष ! नाहीतर होऊ शकते मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान, वाचा डिटेल्स

Home Loan Tips:- स्वतःचे घर असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते.परंतु हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी मात्र लागणारा पैसा हा प्रचंड प्रमाणात लागतो. सध्या महागाईच्या कालावधीमध्ये दैनंदिन वापराच्या आवश्यक गोष्टींसोबतच अनेक घटकांचे भाव देखील मोठ्या प्रमाणावर वाढल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त झालेली आहे.

या सगळ्या महागाईच्या भस्मासुरामुळे घर बांधण्यासाठी लागणारे साहित्य देखील प्रचंड प्रमाणात महागले आहे. त्यामुळे साहजिकच घर स्वतः बांधायचे राहिले किंवा बांधलेले घर विकत घ्यायचे राहिले तरी खूप पैसा मोजावा लागतो.

याच अनुषंगाने घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्यापैकी बरेच व्यक्ती हे गृह कर्ज म्हणजे होम लोन चा आधार घेतात व त्या माध्यमातून स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करतात. परंतु होम लोन घेताना तुमचे घराचे स्वप्न तर पूर्ण होते परंतु त्यानंतर आर्थिक समस्या उद्भवू नयेत याकरिता होम लोन घेताना काही गोष्टींची काळजी घेणे देखील तेवढेच गरजेचे असते.

याच अनुषंगाने या लेखांमध्ये आपण गृह कर्ज म्हणजेच होम लोन घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबद्दल माहिती घेणार आहोत.

होमलोन घेताना या गोष्टींची घ्या काळजी

1- जेव्हा तुम्ही होमलोनसाठी अर्ज करता तेव्हा तुमच्याकडे संबंधित घराच्या डाऊन पेमेंट करिता किती पैसे आहेत किंवा किती रोख रक्कम आहे याची स्वतः खात्री करून घेणे गरजेचे आहे.

जर तुम्ही संपूर्णपणे घर घेण्याकरिता होम लोन वर अवलंबून असाल तर तुम्ही कर्जाच्या विळख्यात अडकण्याची दाट शक्यता या माध्यमातून निर्माण होऊ शकते. त्यामुळे तुमच्याकडे डाऊन पेमेंट करण्याकरिता वीस ते तीस टक्के स्वतःचे पैसे असणे गरजेचे आहे.

2- तसेच तुम्हाला होम लोन घ्यायचे असेल किंवा कुठल्याही प्रकारचे कर्ज बँकेकडून किंवा इतर वित्तीय संस्थांकडून घ्यायचे असेल तर तुमचा सिबिल स्कोर चांगला असणे गरजेचे असते. तुमचा सिबिल स्कोर किंवा तुमची क्रेडिट हिस्ट्री चांगली असेल तर बँक किंवा इतर एनबीएफसी म्हणजेच वित्तीय संस्था तुमची कर्जाची मागणी किंवा अर्ज ताबडतोब मान्य करतात.

त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोर चांगला असणे गरजेचे आहे व तुमच्या क्रेडिट स्कोर चांगला असेल तर तुम्हाला कमीत कमी व्याज दरात कर्ज मिळते.

3- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जर तुम्ही आधीच कार लोन किंवा पर्सनल लोन घेतले असेल तर तुम्ही ते लोन क्लिअर झाल्याशिवाय होम लोन घेण्याच्या भानगडीत पडू नये. जर तुम्ही अगोदरच पर्सनल लोन किंवा कार लोन फेडत असाल तर यामध्ये तुम्ही होम लोन घेतले तर तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये ईएमआय भरावा लागू शकतो.

त्यामुळे गृह कर्ज घेताना तुम्ही तुमच्याकडे कुठल्याही बँकेचे किंवा वित्तीय संस्थेचे अगोदर कर्ज नाही त्याचा विचार करणे खूप गरजेचे आहे. नाहीतर तुमचे आर्थिक बजेट बिघडण्याची खूप दाट शक्यता असते.

4- तुम्हाला एखादे घर किंवा प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर तुमची आर्थिक क्षमता किंवा तुमचा बजेट लक्षात ठेवूनच निर्णय घ्यावा. जर तुम्ही तुमच्या आर्थिक क्षमतेपेक्षा जास्त किमतीची प्रॉपर्टी खरेदी केली तर तुम्हाला अनेक प्रकारच्या आर्थिक समस्या उद्भवू शकतात.

याव्यतिरिक्त तुम्ही बजेटमध्ये राहून मालमत्ता खरेदी केली तर तुम्हाला पैशांची व्यवस्था करणे देखील सोपे होते व तुमच्या डोक्यावर कमीत कमी कर्जाचा बोजा पडतो. या दृष्टिकोनातून आपण होमलोन घेताना या छोट्या परंतु अतिशय महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts