Pension Scheme : निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन हा सर्वात मोठा उत्पन्नाचा स्रोत आहे. म्हणूनच निवृत्तिपपूर्वी याची तयारी करणे फार महत्वाचे आहे. तसेच बाजरात अनेक निवृत्ती योजना उपलब्ध आहेत. तसेच सरकारद्वारे देखील एका पेक्षा एक निवृत्ती योजना राबवल्या जात आहेत. पण या योजनांमध्ये मर्यादा आहेत. आज आम्ही तुमहाला अशा योजनांबद्दल सांगणार आहोत जिथून तुम्ही अमर्यादित उत्पन्नाचा लाभ घेऊ शकता.
या योजनांमध्ये गुंतवणुकीसाठी कोणतीही निश्चित मर्यादा नाही. तसेच, येथील पेन्शनची रक्कम गुंतवणुकीवर अवलंबून असते. इतकेच नाही तर या प्लॅनमध्ये कर सूट आणि कर्ज सुविधाही उपलब्ध आहेत. चला या खास पेन्शन योजनांबद्दल जाणून घेऊया.
SBI सरल सेवानिवृत्ती योजना
या योजनेत १८ ते ६५ वयोगटातील कोणतीही व्यक्ती गुंतवणूक करू शकते. येथील पॉलिसीची मुदत 5, 10 आणि 15 वर्षे आहे. गुंतवणुकीची किमान रक्कम 1 लाख रुपये आहे. येथे कर सूट सुविधा देखील उपलब्ध आहे. 7500 रुपयांच्या प्रीमियमवर 1 लाख रुपयांची विमा रक्कम उपलब्ध आहे. गुंतवणुकीवर मर्यादा नाही. तुम्ही जितकी गुंतवणूक कराल तितकाच तुम्हाला परतावा मिळेल.
एलआयसी जीवन अक्षय VII
LIC हे भारतातील सर्वात जुनी आणि गुंतवणुकीसाठी विश्वसनीय व्यासपीठांपैकी एक आहे. LIC च्या विशेष पेन्शन योजनांपैकी एक म्हणजे “जीवन अक्षय VII” योजना. ही तत्काळ वार्षिकी योजना आहे. या अंतर्गत, 10 वार्षिकी पर्याय उपलब्ध आहेत. योजनेच्या खरेदी किमतीवर कोणतीही मर्यादा नाही, किमान खरेदी किंमत 1 लाख रुपये आहे.पॉलिसीची मुदत संपूर्ण आयुष्यासाठी असते. संयुक्त जीवनाची सुविधाही उपलब्ध आहे. प्रीमियम दर महिन्याला, दरवर्षी किंवा दर दोन वर्षांनी भरता येतो. यावर डेथ, मॅच्युरिटी आणि आयकर सवलती मिळतात. तुम्ही यावर कर्जही घेऊ शकता. तुम्ही दरमहा किमान 1,000 रुपये गुंतवू शकता.
टाटा एआयए फॉर्च्यून मॅक्सिमा योजना
ही एक युलिप योजना आहे, ज्यामध्ये जीवन संरक्षण असल्याचा दावा केला जातो. या अंतर्गत अनेक पेमेंट पर्याय उपलब्ध आहेत. येथे तुम्हाला कर लाभ देखील मिळू शकतो. या योजनेत १८ ते ५५ वयोगटातील कोणीही गुंतवणूक करू शकतो. परिपक्वतेचे वय 65 वर्षे आहे. या योजनेत वर्षाला किमान 12 हजार रुपयांची गुंतवणूक करता येईल. गुंतवणुकीवर आणि विमा रकमेवर मर्यादा नाही. तुम्ही जितकी गुंतवणूक कराल तितकीच तुम्हाला पेन्शन मिळेल.