Pension Scheme : भविष्यासाठी बचत योजना सुरू केल्यास वृद्धापकाळातील आर्थिक तणावातून आराम मिळतो. नोकरीच्या सुरुवातीपासूनच भविष्यासाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. पण बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, की गुंतवणूक करायची कुठे? आज आम्ही याच प्रश्नाचे उत्तम घेऊन आलो आहोत, बरेचजण सुरक्षित गुंतवणूक करण्याकडे जास्त भर देतात, अशातच आम्ही आज अशाच सुरक्षित गुंतवणूक योजना तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, जिथे गुंतवणूक करून तुम्ही भविष्यात चिंता मुक्त होऊ शकता. आज आम्ही अशा सेवानिवृत्ती योजना सांगणार आहोत, जिथे गुंतवणूक केल्यानंतर वृद्धापकाळात तुम्ही आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होऊ शकता.
टॉप सेवानिवृत्ती योजना
राष्ट्रीय पेन्शन योजना
तुम्हाला कोणत्याही सुरक्षित गुंतवणूक योजनेत गुंतवणूक करायची असेल तर राष्ट्रीय पेन्शन योजना तुमच्यासाठी अधिक चांगली होईल. ही एक सुरक्षित योजना आहे, ज्यामध्ये पैसे गमावण्याचा धोका नाही. राष्ट्रीय पेन्शन योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना पेन्शन मिळते. एवढेच नाही तर तुम्ही या योजनेत तीन वर्षे सतत प्रीमियम भरल्यास तीन वर्षांनी त्यातून पैसेही काढता येतील.
एलआयसी सरल पेन्शन योजना
जर तुम्हाला सुरक्षित आणि सरकारी योजनेत गुंतवणूक करायची असेल, ज्यामध्ये वृद्धापकाळ सुरक्षित ठेवता येईल, तर LIC ची सरल पेन्शन योजना तुमच्यासाठी अधिक चांगली असेल. या योजनेत, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही वयाच्या 60 व्या वर्षापासूनच नव्हे तर वयाच्या 40 व्या वर्षापासून पेन्शन घेणे सुरू करू शकता. यामध्ये तुम्हाला एकरकमी रक्कम गुंतवावी लागेल. त्यानंतर तुम्ही आयुष्यभर पेन्शन घेऊ शकता. जेव्हा तुम्ही पॉलिसी सरेंडर करता तेव्हा ठेवीपैकी 95 टक्के रक्कम तुम्हाला परत केली जाते.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना
ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही सरकारी आणि सुरक्षित योजना आहे. ज्यामध्ये पाच वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. पाच वर्षांनंतर तुम्ही ते आणखी वाढवू शकता. गुंतवणुकीवर तुम्हाला या योजनेत ७.४ टक्के व्याज मिळते. गुंतवणूकदार फक्त 1,000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकतात.
पंतप्रधान वय वंदन योजना
तुम्हाला कुठेतरी सुरक्षित गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवायचा असेल, तर तुम्ही प्रधानमंत्री वय वंदन योजनेत गुंतवणूक सुरू करू शकता. ज्यामध्ये तुम्हाला वृद्धापकाळात मासिक पेन्शन मिळेल. या योजनेत तुम्ही 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. तुम्हाला हवे असल्यास, तुम्हाला दरमहा 1,000 रुपये ते 10,000 रुपये पेन्शन मिळू शकते.
अटल पेन्शन योजना
18 ते 40 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करू शकते. ज्यामध्ये 60 वर्षांचे झाल्यानंतर दरमहा 1,000 ते 5,000 रुपये पेन्शन मिळू शकते. कोणताही गुंतवणूकदार 100 टक्के काढू शकतो.