आर्थिक

Personal Loan : 5 बँका देत आहेत सर्वात स्वस्त वैयक्तिक कर्ज, ‘इतका’ पाहिजे CIBIL स्कोर…

Personal Loan : जेव्हा एखाद्या व्यक्तीला मोठ्या पैशांची गरज असते, तेव्हा ती व्यक्ती वैयक्तिक कर्जाची मदत घेते. वैयक्तिक कर्ज हे इतर कर्जापेक्षा खूप महागडे असते, म्हणूनच कर्ज घेताना नेहमी बँकांचे व्याजदर तपासणे तुमच्यासाठी फार महत्वाचे ठरते.

वैयक्तिक कर्जावरील व्याज ठरवण्याचे निकष प्रत्येक बँकेसाठी वेगवेगळे असतात. सामान्यतः असे मानले जाते की ज्या कालावधीसाठी वैयक्तिक कर्ज घेतले जाते, म्हणजे तितका जास्त काळ असेल बँक त्यावर जास्त व्याज आकारते. अशात, शॉर्ट टर्म वैयक्तिक कर्ज घेणे केव्हाही फायद्याचे ठरते. आज आपण अशा बँकाबद्दल जाणून घेणार अहोत, ज्या वैयक्तिक कर्ज अगदी स्वस्तात ऑफर करत आहेत.

कोणत्या बँका सर्वात स्वस्त वैयक्तिक कर्ज देत आहेत?

-बँक ऑफ महाराष्ट्रकडून 84 महिन्यांच्या कालावधीसाठी 20 लाख रुपयांपर्यंतच्या वैयक्तिक कर्जावरील व्याजदर 10.00 टक्क्यांपासून सुरू होतो.

-84 महिन्यांच्या कालावधीसाठी बँक ऑफ इंडियाच्या 20 लाख रुपयांपर्यंतच्या वैयक्तिक कर्जावरील व्याजदर 10.25 टक्क्यांपासून सुरू होतो.

-IDFC फर्स्ट बँकेकडून 6 ते 60 महिन्यांसाठी 1 कोटी रुपयांपर्यंतच्या वैयक्तिक कर्जावरील प्रारंभिक व्याज दर 10.49 टक्के आहे.

-कोटक महिंद्रा बँक 12 ते 60 महिन्यांसाठी 10.99 टक्के प्रारंभिक व्याज दराने वैयक्तिक कर्ज देत आहे.

-फेडरल बँक 48 महिन्यांच्या कालावधीसह 11.49 टक्के प्रारंभिक व्याज दराने 25 लाखांपर्यंत वैयक्तिक कर्ज देत आहे.

चांगला क्रेडिट

वैयक्तिक कर्ज घेताना कोणत्याही व्यक्तीसाठी चांगला क्रेडिट स्कोअर ठेवणे खूप महत्वाचे आहे, तुमचा क्रेडिट स्कोर जितका जास्त असेल. तुम्हाला बँकेकडून त्याच कमी व्याजदरावर वैयक्तिक कर्ज दिले जाईल. 750 पेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर सामान्यतः चांगला मानला जातो.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts