आर्थिक

Personal Loan : अचानक पैशांची गरज आहे तर ‘या’ 5 बँका देता आहेत सर्वात स्वस्त वैयक्तिक कर्ज, बघा…

Personal Loan : अचानक जास्त पैशांची गरज भासल्यास प्रत्येक व्यक्ती बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेतो. पण इतर कर्जापेक्षा वैयक्तिक कर्ज खूप महागडे असते. अशास्थितीत वैयक्तिक कर्ज तेव्हाच घेतले पाहिजे जेव्हा त्याची मोठी गरज असते. आणि तुमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो. कधीही वैयक्तिक कर्ज घेताना माहिती गोळा करणे फार गरजेचे असते.

वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी ग्राहकाने वेगवेगळ्या बँकांच्या ऑफर्सची तुलना केली पाहिजे. जेणेकरून त्याला स्वस्त दरात कर्ज मिळू शकेल. आपण पर्सनल लोन नेहमी जिथे स्वस्त मिळत आहे तिथून घेतले पाहिजे. तसेच कर्ज घेताना नेहमी प्रक्रिया शुल्काचीही तुलना करावी. ज्या ग्राहकांचा क्रेडिट स्कोअर चांगला आहे त्यांना वैयक्तिक कर्जावर योग्य व्याजदर मिळतो. दरम्यान आज आपण अशा 5 बँकांबद्दल जाणून घेणार आहोत ज्या वैयक्तिक कर्ज सर्वात कमी व्याजदरात देत आहेत.

बँक ऑफ इंडिया

बँक ऑफ इंडिया 20 लाखांपर्यंतच्या वैयक्तिक कर्जावर 10.25 किंवा त्याहून अधिक व्याजदर देत आहे. येथे कालावधी 84 महिन्यांपर्यंत आहे.

बँक ऑफ बडोदा

बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना 50,000 ते 20 लाखांपर्यंतच्या कर्जाच्या रकमेसाठी, 10.35% ते 17.50% वार्षिक व्याजदर आकारात आहे. या कर्जाचा कार्यकाळ 48 ते 60 महिन्यांचा असेल.

पंजाब आणि सिंध बँक

पंजाब आणि सिंध बँक 3 लाख रुपयांपर्यंतच्या वैयक्तिक कर्जावर 10.15 टक्के ते 12.80 टक्के व्याजदर आकारात आहे. या कर्जाचा कालावधी 60 महिन्यांपर्यंत आहे.

इंडसइंड बँक

इंडसइंड बँक 30,000 किंवा त्यापेक्षा जास्त 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी, 10.25% ते 32.02% व्याजदर आकारात आहे. कर्जाचा हा कालावधी 12 महिने ते 60 दिवसांचा आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र

बँक ऑफ महाराष्ट्र 20 लाख रुपयांपर्यंतच्या वैयक्तिक कर्जावर 10 टक्के किंवा त्याहून अधिक व्याज दर देत आहे. यातील कालावधी 84 महिन्यांचा असेल.

Sonali Shelar

Published by
Sonali Shelar

Recent Posts