Personal Loan:- दैनंदिन आयुष्यामध्ये सकाळी उठल्यापासून आपल्याला पैशांची गरज भासते. दैनंदिन गरजांकरिता तर पैसा लागतोच.परंतु कधीकधी जीवन जगत असताना अचानकपणे काही घरातील कार्यक्रम, मुलांच्या शिक्षणाची फी किंवा आपत्कालीन वैद्यकीय परिस्थिती जर उद्भवली तर अचानकपणे मोठ्या रकमेची गरज भासते.
दुसरी महत्वाची बाब म्हणजे अशी गरज भासल्या नंतर प्रत्येक वेळी तितका पैसा आपल्याकडे असतो असे देखील नाही. त्यामुळे साहजिकच व्यक्ती कर्जाचा पर्याय अवलंबतो व या पर्यायांमध्ये जास्त करून वैयक्तिक कर्ज अर्थात पर्सनल लोनला जास्त प्रमाणात प्राधान्य दिले जाते.
कुठलेही कर्ज घेताना सगळ्यात अगोदर कर्ज घेणारा व्यक्ती हा त्या बँकांचा व्याजदर पाहत असतो. कारण व्याजदराचा प्रत्यक्षरीता परिणाम हा त्या कर्जाची रक्कम परतफेडीवर आणि आपल्या आर्थिक बजेटवर देखील मोठ्या प्रमाणावर होत असल्याने व्याजदराचा विचार करून कर्ज घेणे तितकेच फायद्याचे असते.
पर्सनल लोन हा एक महत्त्वाचे कर्ज प्रकार असून यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची मालमत्ता तारण म्हणून देण्याची गरज नसते.म्हणजेच हे एक असुरक्षित कर्ज प्रकारातील कर्ज आहे. यामध्ये संबंधित अर्जदाराचा क्रेडिट स्कोर अर्थात सिबिल भक्कम असेल तर कुठलीही बँक तुम्हाला झटक्यात कर्ज देते.
यामध्ये सर्वच बँका पर्सनल लोनची सुविधा पुरवतात व प्रत्येक बँकेचे व्याजदर हे वेगळे असतात. उदाहरणादाखल जर आपण सेंट्रल बँकेच्या विचार केला तर ही बँक तुम्हाला 8.90% व्याजदराने पर्सनल लोन देते व युनियन बँक हे देखील 8.90 टक्के व्याजदराने तुम्हाला पर्सनल लोन देते. या पद्धतीने तुम्हाला देखील जर पर्सनल लोन घ्यायचे असेल तर या संबंधी भारतातील कुठली बँक किती व्याजदर आकाराते या संबंधीची माहिती आपण या लेखात घेऊ.
या बँका देतात सर्वात स्वस्त दरात वैयक्तिक अर्थात पर्सनल लोन
सेंट्रल बँक ऑफ इंडिया व्याजदर 8.90%, युनियन बँक व्याजदर 8.90%, पीएनबी अर्थात पंजाब नॅशनल बँक व्याजदर 8.90%, इंडियन बँक व्याजदर 9.05%, बँक ऑफ महाराष्ट्र व्याजदर 8.45%, पंजाब आणि सिंध बँक व्याजदर 9.50%, आयडीबीआय बँक व्याजदर 9.50%, एसबीआय व्याजदर 9.60%,
बीओबी अर्थात बँक ऑफ बरोडा व्याजदर 10%, युको बँक व्याजदर 10.05%, कोटक बँक व्याजदर 10.25%, बँक ऑफ इंडिया व्याजदर 10.35%, येस बँक व्याजदर 10.40%, आयडीएफसी बँक व्याजदर 10.49%, एचडीएफसी बँक व्याजदर 10.50%, आयसीआयसीआय बँक व्याजदर 10.50%,
साउथ इंडियन बँक व्याजदर 10.50%, आयओबी बँक व्याजदर 10.80%, इंडसइंड बँक व्याजदर अकरा टक्के, कॅनरा बँक व्याजदर 11.25%, धनलक्ष्मी बँक व्याजदर 11.90%, ॲक्सिस बँक व्याजदर 12% आणि कर्नाटका बँक व्याजदर 12.45% अशा पद्धतीने भारतातील काही बँकांचे पर्सनल लोन संबंधीचे व्याजदर आहेत.