आर्थिक

PKH Ventures IPO : गुंतवणूकरदारांनो.. तयार ठेवा पैसे! लवकरच येणार ‘या’ दिग्गज कंपनीचा IPO

PKH Ventures IPO : येत्या काही दिवसात गुंतवणूकदारांना गुंतवणुकीची चांगली संधी मिळणार आहे. कारण लवकरच शेअर बाजारातील काही आयपीओ खुले केले जाणार आहेत. त्यामुळे येणार आठवडा अनेक कंपन्यांच्या आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी खुला असणार आहे.

यात कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट, हॉस्पिटॅलिटी आणि मॅनेजमेंट सर्व्हिसेसशी निगडित असणाऱ्या पीकेएच व्हेंचर्सच्या आयपीओचाही समावेश असणार आहे. परंतु सर्वात अगोदर हे लक्षात ठेवा की या कंपनीचा आयपीओ 30 जून 2023 रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होऊन तो 4 जुलै 2023 रोजी बंद होणार आहे.

कंपनी काय करते? जाणून घ्या

मुंबईस्थित कंपनी बांधकाम तसेच व्यवस्थापन आणि आदरातिथ्य सेवांमध्ये गुंतली असून ही कंपनी दोन हॉटेल्स चालवत आहे. तसेच या कंपनीच्या इश्यूमध्ये 1.82 कोटी इक्विटी शेअर्सचा ताजा इश्यू आणि प्रवर्तकाने 73.73 लाख शेअर्सचा ऑफर फॉर सेलचा समावेश करण्यात आला आहे.

अशातच आता ही कंपनी या IPO द्वारे प्राइस बँडच्या खालच्या आणि वरच्या टोकाला 358.85 कोटी रुपये तसेच 379.35 कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न करू शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला जर कोणतीही माहिती नसेल तर शेअर बाजारात चुकूनही गुंतवणूक करू नका. जर तुम्ही असे केले तर तुम्हाला आर्थिक त्रास सहन करावा लागेल..

अनेक कंपन्यांचे आयपीओ येणार

दरम्यान हे लक्षात घ्या की आगामी काही दिवसांत अनेक कंपन्यांचे आयपीओ एकामागून एक बाजारात दाखल होणार आहेत. अशातच आता तीन कंपन्या मुख्य मार्गाने त्यांचे आयपीओ घेऊन येत आहेत. तसेच 4 कंपन्यांना त्यांचे शेअर्स एसएमई मार्गाद्वारे सूचीबद्ध करण्यात येणार आहेत. या सर्व कंपन्या बाजारातून 1600 कोटींपेक्षा जास्त रक्कम उभारण्याचा विचार करत आहेत.

आता ज्या कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत, त्यापैकी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटशी संबंधित सेवा देणाऱ्या त्रिध्या टेक कंपनीचा आयपीओही पुढील आठवड्यात बोलीसाठी खुला केला जाणार आहे. कंपनीकडून आपल्या IPO साठी 35-42 रुपये प्रति शेअर किंमत बँड निश्चित करण्यात आला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts