Pm Kisan Update:- केंद्र सरकारची पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही एक महत्वपूर्ण योजना असून या योजनेला सर्वात यशस्वी योजना म्हणून देखील ओळखले जाते. आपल्याला माहित आहे की या योजनेच्या माध्यमातून वार्षिक सहा हजार रुपये तीन टप्प्यात विभागून शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जातात.
आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून 15 हप्त्यांचे वितरण करण्यात आलेले असून लवकरच सोळावा हप्ता देखील वितरित केला जाईल अशी अपेक्षा आहे. परंतु या सोळाव्या हफ्त्याआधी या योजनेच्या संबंधी एक महत्त्वाचे अपडेट समोर आलेले असून ती शेतकऱ्यांना माहीत असणे खूप गरजेचे आहे.
काय आहे पीएम किसान योजनेसंबंधी ताजी अपडेट?
ही ताजी अपडेट ई केवायसीशी संबंधित असून ज्या शेतकऱ्यांनी अजून पर्यंत त्यांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांनी ती लवकरात लवकर पूर्ण करणे गरजेचे आहे. महत्वाचे म्हणजे यासाठीची शेवटची तारीख 31 जानेवारी निश्चित करण्यात आलेली आहे.
या तारखेपर्यंत जर शेतकऱ्यांनी ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली नाही तर शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता जमा होणार नाही एवढेच नाही तर अशा शेतकऱ्यांचे खाते देखील निष्क्रिय केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ईकेवायसी करून घेणे गरजेचे आहे
व याकरिता भारत संकल्प यात्रे अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच अशा परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील नोंदणी केलेली नाही ते कॉमन सर्विस सेंटर म्हणजे सीएससी सेंटर किंवा ई मित्राच्या मदतीने याकरता अर्ज देखील करू शकतात.
तुम्हाला जर इ केवायसी करायची असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या सीएससी केंद्राला किंवा बँकेच्या शाखेला भेट देऊन ती करू शकतात. याशिवाय तुम्ही पीएम किसान योजनेच्या पोर्टलवर देखील ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात. यासाठी तुम्हाला या योजनेच्या संकेतस्थळावर दिलेल्या ईकेवायसी या पर्यायावर क्लिक करावे लागेल व पुढील प्रक्रियेचे पालन करून तुम्हाला ई केवायसी करता येईल. तुम्हाला ती ऑनलाईन पद्धतीने करायची असेल तर खालील पद्धतींचा वापर करून ती तुम्ही करू शकतात.
1- याकरिता तुम्हाला पीएम किसान योजनेचे www.pmkisan.gov.in संकेतस्थळावर जावे.
2- त्यानंतर होम पेजवर जेव्हा जाल तेव्हा ई केवायसी वर टॅप करावे.
3- त्यानंतर तुमचा आधार क्रमांक आणि इतर महत्त्वाची माहिती त्या ठिकाणी नमूद करावी.
4- हे सर्व प्रक्रिया केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर एक ओटीपी येतो व तो आलेला ओटीपी येईल तो नमूद करावा. त्यानंतर तुमची ई केवायसी पूर्ण होईल.
5- याशिवाय सीएससी केंद्राला देखील भेट देऊन ऑफलाइन केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येऊ शकते.
अधिक माहितीसाठी इथे संपर्क करा
या योजनेचे संबंधित कोणती समस्या असल्यास शेतकरी हेल्पलाइन क्रमांक 155261 किंवा 18000115526 किंवा 011-23381092या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.