Pm Narendra Modi Net Worth:- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या 2014 पासून पंतप्रधान पदाची जबाबदारी सांभाळत असून त्यांच्या कालावधीमध्ये खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवर भारताची एक विशिष्ट ओळख निर्माण झाली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. देशाच्या राजकारणात येण्याअगोदर ते गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म हा 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरात राज्यातील वडनगर या ठिकाणी झाला.
त्यांचा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ पाहिला तर तो साधारणपणे 2001 ते 2014 पर्यंत असा आहे. ते 2001 च्या ऑक्टोबरमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री झाले होते व त्यानंतर सरळ चार वेळा विधानसभा जिंकत त्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे नेते असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक देखील आहेत. गुजरात राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांची भूमिका महत्त्वाची आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडिलांचे नाव दामोदरदास मूळचंद मोदी व आईचे नाव हिराबेन असे होते. सध्या ते भारताच्या पंतप्रधान पदावर विराजमान असून भारताच्या विकासाच्या दृष्टिकोनातून देखील महत्त्वाची भूमिका पार पाडताना दिसून येत आहेत. याच अनुषंगाने आपण या लेखामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकूण संपत्ती किंवा त्यांना पगार किती मिळतो? यासंबंधीची महत्त्वाची माहिती बघणार आहोत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे किती आहे संपत्ती?
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या 2014 पासून ते आतापर्यंत पंतप्रधान पदाची धुरा सांभाळत असून त्यांच्या संपत्ती बद्दल किंवा त्यांना पगार किती मिळते? इत्यादी प्रश्न अनेकांच्या मनात येतात. यासंबंधी जर आपण माहिती घेतली तर मागच्या वर्षी पीएमओ ऑफिसने याबाबत एक माहिती शेअर केली होती व त्यानुसार आपण पाहिले तर भारताच्या पंतप्रधानांचा पगार हा एका वर्षाला वीस लाख रुपये इतका आहे.
म्हणजेच नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान म्हणून महिन्याला पगार पाहिला तर यानुसार तो दोन लाख रुपये इतका होतो. हे झाले त्यांचे मूळ वेतन व या मूळ वेतनाव्यतिरिक्त त्यांना त्यांच्या पगारांमध्ये खासदार भत्ता तसेच दैनिक भत्ता व इतर अनेक भत्ते देखील मिळतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकूण नेटवर्थ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्च 2022 पर्यंतच्या एकूण जंगम आणि स्थावर मालमत्तेचा जर आपण तपशील पाहिला तर पंतप्रधान कार्यालयाकडून तो 2022 मध्ये जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार पाहिले तर त्यांच्याकडे एकूण 2.23 कोटी रुपयांची संपत्ती आहे. पीएमओच्या संकेतस्थळानुसार जर विचार केला तर त्यांची सर्वाधिक म्हणजेच दोन कोटी 23 लाख रुपयांची संपत्ती बँक खात्यांमध्ये जमा आहे.
पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची स्थावर मालमत्ता वगैरे नाही. गुजरात राज्यातील गांधीनगर या ठिकाणी त्यांच्या मालकीची जमीन होती व ती देखील त्यांनी दान केली आहे. जेव्हा ते 2002 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी एक निवासी जमीन खरेदी केलेली होती व त्यामध्ये ते तिसरे हिस्सेदार म्हणून सहभागी होते.
परंतु आता त्या मालमत्तेत त्यांच्याकडे कोणताही मालकी हक्क नसून कारण त्यांनी त्यांच्या वाट्याचा हिस्सा दान करून दिलेला आहे.दुसरे महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे म्युच्युअल फंड किंवा शेअर्स किंवा बॉण्ड इत्यादी मध्ये कुठल्याही प्रकारची गुंतवणूक नाही.
दुसरे महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे वाहन देखील नाही. जर आपण मार्च 2022 पर्यंतची त्यांची मालमत्तेची एकूण आकडेवारी पाहिली तर त्यामध्ये 1.73 लाख रुपयांच्या चार सोन्याच्या अंगठ्या व पोस्ट ऑफिस मध्ये नऊ लाख 5 हजार 105 रुपयांची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे आणि एक लाख 89 हजार तीनशे पाच रुपयांची जीवन विमा पॉलिसी आहे.